Randeep hooda Gautam Gaulati and Sangey  twitter
मनोरंजन

माजी सैन्य अधिकाऱ्याने साकारला 'राधे'मधील खलनायक; पाहा फोटो

सांगे हा सलमानचा खूप मोठा चाहता असून त्याने आजवर सलमानचे अनेक चित्रपट पाहिले आहेत.

स्वाती वेमूल

अभिनेता सलमान खानचा Salman Khan 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' Radhe Your Most Wanted Bhai हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कमाईकडे, त्यातील कलाकारांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुडाने Randeep Hooda मुख्य खलनायकाची भूमिका साकारली. त्याच्यासोबत गौतम गुलाटी आणि सांगे शेल्ट्रिम Sangay Tsheltrim यांनी गुन्हेगारांची भूमिका साकारली. यापैकी सांगे हा भूतानचा माजी सैन्य अधिकारी आहे. (Did you know Radhe villain Sangay Tsheltrim was a Bhutanese army officer)

सांगे हा सलमानचा खूप मोठा चाहता असून त्याने आजवर सलमानचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. याविषयी 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "मी सलमानचेच चित्रपट पाहत लहानाचा मोठा झालो. बॉलिवूड पदार्पणाबाबत माझा काही विचार नव्हता. पण कदाचित सलमानसोबत काम करणं हे माझ्या नशिबात लिहिलं होतं. त्यांच्यामुळेच मला चित्रपटात भूमिका मिळाली." 'राधे'मधील भूमिकेमुळे भूतानमध्ये फार प्रसिद्धी मिळत असल्याचं सांगेने सांगितलं. "भविष्यात मला मोठ्या भूमिका मिळाल्या तर मी ११० टक्के मन लावून काम करेन. मी स्वत: सैन्यात अधिकारी होतो, म्हणून सैन्य अधिकाऱ्याची भूमिका एकदा तरी मिळावी अशी माझी इच्छा आहे. याशिवाय मला अॅक्शन हिरोचीही भूमिका आवडेल", असं तो म्हणाला.

सैन्यातून अभिनयक्षेत्रात पदार्पणाविषयी त्याने पुढे सांगितलं, "सैन्य दलातील अधिकाऱ्यापासून ते बॉडी बिल्डरपर्यंतच्या माझ्या प्रवासाने मला अभिनेता होण्यास प्रवृत्त केलं. अभिनेता होण्याचं माझं स्वप्न किंवा महत्त्वाकांक्षा अजिबात नव्हती. मी चुकून या क्षेत्रात आलो."

'राधे' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. हा चित्रपट काही थिएटर्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. जगभरात या चित्रपटाची पहिल्या दिवशी ४.४ कोटी रुपये इतकी कमाई झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT