Digpal Lanjekar shared video tesla car light show in USA bay area with Chhatrapati shivaji maharaj song in pawankhind movie  sakal
मनोरंजन

Digpal Lanjekar: अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांना दिली अशी मानवंदना की पाहून अंगावर काटा येईल.. Viral Video

नीलेश अडसूळ

Digpal Lanjekar: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.. महाराज होते म्हणून आज आपण आहोत. माय मराठीचा झेंडा अटकेपार नेणाऱ्या या राजाचा प्रताप इतका मोठा आहे की, आपलं आयुष्य वेचलं तरी त्याची पूर्तता होणार नाही.

त्यामुळे आपण कायमच महाराजांना देवासमान मानतो आणि त्यांना पूजतो. महाराजांना वंदन केल्याशिवाय महाराष्ट्रात तरी कोणतेच कार्य सुरू होत नाही. पण आता देशातच नव्हते तर देशाबाहेर म्हणजे चक्क अमेरिकेत महाराजांना मानवंदना देण्यात आली आहे.

अत्यंत वेगळ्या पद्धतीची अशी ही मानवंदना असून त्याचा व्हिडिओ 'शिवअष्टक' चित्रपटाचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने शेयर केला आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून येईल..

(Digpal Lanjekar shared video tesla car light show in USA bay area with Chhatrapati shivaji maharaj song in pawankhind movie)

लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक अशी बहूख्याती असलेला कलाकार म्हणजे दिग्पाल लांजेकर. त्याचे शिवप्रेम आणि महाराजांवरील अभ्यास हा अवघ्या जगाला ठाऊक आहे. त्याने काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांवर आठ चित्रपट म्हणजे 'शिवअष्टक' करणार असल्याची घोषणा केली होती.

त्यानंतर त्याने ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि 'शेर शिवराज' असे चार दमदार चित्रपट दिले. ज्यातून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र मांडण्याचा प्रयत्न केला. लवकरच त्याचा 'सुभेदार' हा पाचवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अशातच दिग्पालने एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहेत. अमेरिकेत महाराजांना दिलेली अनोखी मानवंदना त्याने व्हिडिओच्या माध्यमातून शेयर केली आहे.

अमेरिकेमध्ये 'हिंदू युवा' तर्फे ४५ टेस्ला कार्स एकत्र करून त्यांचा लाइट शो करण्यात आला. यावेळी मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून त्यांना मानवंदना देण्यात आली. यासाठी दिग्पालच्या 'पावनखिंड' चित्रपटातील 'राजं आलं राजं आलं..' हे गाणं वाजवण्यात आलं. हाच अंगावर काटा आणणारा व्हिडिओ त्याने शेयर केला आहे.

या पोस्टवर दिग्पाल म्हणतो, ''शिवराज अष्टक मधील गाणी मनामनात.. ४५ टेस्ला कार्स आणि २४५ प्रेक्षक.. टेस्ला कार्स लाईट शो ‘हिंदू युवा‘ तर्फे USA bay area मध्ये १० जून ला आयोजित करण्यात आला होता.. मराठीतील चित्रपटांच्या गाण्यांवर आधारित हा पहिला टेस्ला शो होता. जय शिवराय..'' असे कॅप्शन या व्हिडिओला दिग्पालने दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT