दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना अभिनयातील बापसाणूस म्हणून ओळखले जाते. आज त्यांची जयंती आहे. ते आता आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी रोजच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या समोर येत असतात.
दिलीपजींचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पाकिस्तानातील पेशावर येथे झाला. दिलीप कुमार यांचे खरे नाव युसूफ खान होते. फाळणीच्या काळात त्यांचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. येथे आल्यानंतर दिलीप कुमार कॅन्टीनमध्ये काम करू लागले. त्यावेळी बॉम्बे टॉकीजचे मालक हिमांशू राय यांची पत्नी देविका राणी यांनी युसूफ यांचे नाव बदलून 'दिलीप कुमार' केले. दिलीप कुमार यांनी 1944 मध्ये 'ज्वार भाटा' या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. पण हा चित्रपट काही फारसा चालला नाही. 1947 मध्ये प्रदर्शित झालेला जुगनू हा दिलीप कुमार यांचा पहिला हिट चित्रपट होता.
दिलीप कुमार यांना ट्रॅजेडी किंग म्हटले जात असले तरी खऱ्या आयुष्यात ते खोडकर होते. सायरा बानू त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात की, साहेब कधी कधी हेलन यांचे 'मोनिका ओ माय डार्लिंग' या गाण्यावर त्यांची हुबेहूब नक्कल करत नाचतात. ते कथ्थक नर्तक गोपी कृष्णा यांचीही नक्कल करायचे.
अभिनेता म्हणून दिलीप कुमार यांच्याशी निगडीत अनेक कथा आणि घटना आहेत, पण अभिनयापलीकडे त्यांच्या आयुष्याशी निगडित अनेक रंजक किस्से आहेत. चाळीशीच्या दशकात चित्रपटात येण्यापूर्वी दिलीप कुमार पैसे कमवण्याचा मार्ग शोधत होते.स्वातंत्र्यपूर्व काळात देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. एकदा त्यांनी घरात भांडण झाल्यावर ते मुंबई सोडून पुण्याला गेले. तिथे त्याना ब्रिटिश आर्मी कॅन्टीनमध्ये काम मिळाले. त्यांनी बनवलेले सँडविच कॅन्टीनमध्ये खूप प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता.
दिलीप कुमार यांनी एके दिवशी पुण्यात भाषण करण्याचा योग आला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे समर्थन केले. आणि ब्रिटिश राज्यकर्ते चुकीचे असल्याचे म्हटले. ही गोष्ट ब्रिटीश सरकारला सहजासहजी पचणारी नव्हती. या गोष्टीची शिक्षा म्हणून दिलीपजींना येरवडा तुरुंगात पाठवण्यात आले. जेथे अनेक स्वातंत्र्यसेनानींना ठेवण्यात आले होते. तिथे त्या लोकांच्या सानिध्यात तेही गांधीवादी झाले.असे त्यांनी ‘द सबस्टन्स अँड द शॅडो' या त्यांच्या पुस्तकात लिहीले आहे.
पुढे ते लिहीतात की, तेव्हा सत्याग्रहींना गांधीवाले म्हणायचे. इतर कैद्यांच्या समर्थनार्थ मीही तुरूंगात उपोषणाला बसलो होतो. तिथे माझ्या ओळखीचा एक ब्रिटीश पोलिस आला तेव्हा मला तुरुंगातून सोडण्यात आले. पण, तिथे काही वेळ राहून मीही गांधीवाला झालो होतो.
1949 मध्ये 'अंदाज' या चित्रपटात त्यांना राज कपूर आणि नर्गिससोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात हा चित्रपट सर्वात जास्त हिट ठरला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि दिलीपजी रातोरात स्टार बनले. त्यानंतर जवळपास सहा दशके रुपेरी पडद्यावर राज्य करणाऱ्या दिलीप कुमार यांनी दीदार, दाग, देवदास, नया दौर, कोहिनूर, मुगल-ए-आझम, गंगा-जमुना, राम और श्याम, क्रांती, सौदागर यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
दिलीप कुमार यांनी 1962 मध्ये नेहरूंच्या सांगण्यावरून, त्यांनी उत्तर मुंबईतून व्हीके कृष्ण मेनन यांच्या निवडणूक प्रचारात भाग घेतला. 1979 मध्ये ते बॉम्बेचे शेरीफ बनले आणि 2000 ते 2006 दरम्यान ते राज्यसभेचे सदस्य होते.
दिलीप कुमार यांना पुस्तकांची खूप आवड होती. त्यांच्या घरी उर्दू, पर्शियन, इंग्रजी पुस्तकांनी बुक शेल्फ भरलेले आहेत. खास गोष्ट म्हणजे, त्यांना कुराण आणि गीता या दोन्ही गोष्टींचे ज्ञान होते. दर्घकाळाच्या आजारपणानंतर दिलीपजींनी या जगाला अलविदा केले. 7 जुलै 2021 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.