dilip prabhavalkar received lifetime achievement mrudgandh award SAKAL
मनोरंजन

Dilip Prbhavalkar: हे माझं भाग्य... लोकशाहीर विठ्ठल उमप 'मृद्गंध' जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना दिलीप प्रभावळकर भावुक

दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Devendra Jadhav

Dilip Prabhavalkar News: जीवनभर लोककलांचा जागर करीत आपल्या कार्यक्रमांद्वारे रसिकांना जणू आनंदाची अद्वितीय पर्वणी देणारे तसेच लोककलेला जीवन अर्पण केलेले लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध मान्यवरांना मृद‌्‌गंध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात रंगलेल्या स्मृतीसंगीत समारोहात मृद‌्‌गंध पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी डॉ. निलम गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय सामंत, गायक नंदेश उमप, माजी महापौर नरेश म्हस्के, गीतकार संदीप खरे, संगीतकार सलील कुलकर्णी, सरिता उमप यांच्यासह मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलीप प्रभावळकर म्हणाले की, "मी अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नाही. मी चुकून या क्षेत्रात आलो आहे. ज्यांच्या कार्याला मी मानतो त्या लोकशाहीर विठ्ठल उमप या लोककलावंतांच्या नावाचा पुरस्कार आजच्या दिवशी मिळाला हे माझे भाग्य मानतो. नट म्हणून काही भूमिका आपण विसरतो पण काही भूमिकांचा माणूस म्हणून माझ्यावर परिणाम झाला आहे. त्या भूमिकांमुळे माझा काही सामाजिक संस्थांशी संपर्क आला, मी त्यांच्याशी जोडलो गेलो. नट म्हणून ही माझी मिळकत आहे."

दिलीप प्रभावळकर पुढे म्हणाले, "नट म्हणून तुमच्यात माणूसकीचा ओलावा जागृत राहीला पाहिजे अन्यथा तुम्ही फक्त कोरडे नट राहता."

इतर मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी गायक सुदेश भोसले, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनुराधा भोसले, लोककलेतील कलावंत आतांबर शिरढोणकर, अभिनय क्षेत्रात उत्तम ठसा उमटवणारे अभिनेता सुमित राघवन, अभिनेत्री चिन्मयी सुमित, नवोन्मेष म्हणून गायिका केतकी माटेगावकर यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी 'आयुष्यावर बोलू काही' या संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांच्या सदाबहार कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले."

लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी स्मृतिसंगीत समारोह आणि मृद‌्‌गंध पुरस्काराचे भव्य आयोजन करण्यात येते. पुरस्कारांचे यंदाचे हे १३ वर्ष आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विठ्ठल उमप हे लोककलेचे हे विद्यापीठ असल्याचे मत व्यक्त करत सामंत म्हणाले की, यंदाचा हा पुरस्कार सोहळा १३वा आहे. १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृतीसंगीत समारोह रत्नागिरीमध्ये होईल. त्या सोहळ्याची जबाबदारी मी घेईन, असेही सामंत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT