Diljit Dosanjh Esakal
मनोरंजन

Diljit Dosanjh: 'अरे समजत नसेल तर गूगल करा', कोचेला येथील झेंड्यावरुन रंगलेल्या वादावर दिलजीत संतापला..

Vaishali Patil

दिलजीत दोसांझ ने अल्पावधितच स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तो सर्वोत्कृष्ट पंजाबी गायक आहे. दिलजित त्याच्या आवाजासाठी आणि दमदार व्यक्तीमहत्वासाठी ओळखला जातो. त्याला आता कुठल्याही ओळखीची गरज नाही.

तो त्याच्या गाण्यावर लोकांना नाचायला भाग पाडतो. त्यांनी एकापेक्षा एक गाणी रिलीज केली आहेत. जाबपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत दिलजीतच्या आवाजाची क्रेझ आहे आणि आता त्याने आपल्या गाण्यांने सगळ्या जगाची मने जिंकली आहेत. दिलजीतने कॅलिफोर्नियातील कोचेला म्युझिक फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म केले आहे.

कॅलिफोर्निया येथे कोचेला व्हॅली म्युझिक अँड आर्ट्स फेस्टिव्हल 2023 मध्ये सादर करणारा दिलजीत दोसांझ पहिला पंजाबी गायक बनला आहे.

कोचेला व्हॅली म्युझिक अँड आर्ट्स फेस्टिव्हल 2023 मध्ये दिलजीतने दोनदा परफॉर्म केले. यावेळी त्याच्या गाण्याबरोबरच त्याच्या आउटफिटनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यामुळे तो चांगलाच चर्चेत राहिला. सगळ्यांनी त्याचे कौतुक केले.

तर त्याला ट्रोलही करण्यात आले. खरं तर, त्याच्या परफॉर्मन्सदरम्यान दिलजीत म्हणाला होता की, "एह मेरे पंजाबी भाई बहन लेई, मेरे देश दा झंडा लाइके खादी आ कुड़ी, एह मेरे देश लायी, नेगेटिविटी से बचो, म्यूजिक सबके लिए है."

दिलजीतच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर खूप चुकीचा अर्थ काढण्यात आला. त्याबद्दल अनेक गैरसमज पसरवण्यात आले आहे. त्यामुळे त्याला खूप ट्रोलही करण्यात आले आहे.

मात्र आता यावर गायकाने आपले मौन सोडले आहे आणि इतकेच नाही तर ट्रोलर्सला सडेतोड उत्तरही दिले. दिलजीतने ट्विटमध्ये लिहिले, खोट्या अफवा आणि नकारात्मकता पसरवू नका, मी म्हणालो हा देशाचा झेंडा आहे, माझ्या देशासाठी आहे… म्हणजे माझी ही कामगिरी माझ्या देशासाठी आहे... तुम्हाला पंजाबी येत नसेल तर गुगल करा. Coachella एक मोठा संगीत महोत्सव आहे जिथे प्रत्येक देशातून लोक येतात. म्हणूनच संगीत प्रत्येकाचं आहे.

आता दिलजितचं हे ट्विट खुप व्हायरल झालं आहे. त्यानंतर दिलजीतला त्याच्या अनेक चाहत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. दिलजीतने जशास तसं उत्तर दिल्याचं अनेकांनी म्हटलं तर त्याचवेळी राजकारणी मनजिंदर सिंग सिरसा यांनीही ट्रोल करणाऱ्यांवर ताशेरे ओढले.

गाण्याव्यतिरिक्त दिलजीत पंजाबी चित्रपटांमध्येही दिसतो. त्याला अभिनयाचीही आवड आहे. दिलजीतने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘चमकिला बायोपिक’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. इम्तियाज अली या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. यात त्याच्यासोबत परिणीती चोप्राही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT