Dimple Kapadia was locked in the make-up van by the director,Read Instagram
मनोरंजन

दिग्दर्शकानं मला ४ तास मेकअप वॅनमध्ये डांबलं; डिंपल कपाडियांचा मोठा खुलासा

डिंपल कपाडिया यांचा आज ६५ वा वाढदिवस आहे. आजही त्या सिनेसृष्टीत कार्यरत राहून आपल्या चाहत्यांना नवनवीन सिनेमांची ट्रीट देत असतात.

प्रणाली मोरे

डिंपल कपाडिया(Dimple Kapadia) यांचा ८ जून रोजी ६५ वा वाढदिवस आहे. ४९ वर्ष आधी डिंपल कपाडिया यांनी अवघ्या १४ व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आपल्या मोठ्या फिल्मी कारकिर्दित डिंपल कपाडिया यांनी खूप हिट आणि लक्षात राहतील असे सिनेमे केले आहेत,ज्यांनी अनेक अॅवॉर्ड्स देखील पटकावले आहेत. पण हा अभिनय क्षेत्रातला प्रवास त्यांच्यासाठी फार सोपा राहिलेला नाही. काही वर्ष आधी डिंपल कपाडिया यांनी एका मुलाखतीत Tenet सिनेमात क्रिस्टोफर नोलन सोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला होता. डिंपल कपाडिया यांनी सांगितलं होतं की कसं दिग्दर्शकानं त्यांना मेकअप वॅन मध्ये बंद केलं होतं. तेव्हा नेमकं काय झालं होतं याचा देखील खुलासा त्यांनी केला आहे.(Dimple Kapadia was locked in the make-up van by the director)

२०२० साली एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत डिंपल कपाडिया म्हणाल्या होत्या की,''क्रिस्टोफर नोलन एक असे दिग्दर्शक आहेत जे आपल्या सिनेमातील प्रत्येक गोष्ट प्रदर्शनापर्यंत लीक होणार नाही याची खूप काळजी घेतात''. डिंपल कपाडिया Tenet सिनेमात एका अशी व्यक्तिरेखा साकारत होत्या जी हत्यारांची तस्करी करत असते.

When Dimple Kapadia was ‘locked up in a make-up van’ to read Christopher Nolan’s Tenet’s script

डिंपल कपाडिया यांना जेव्हा विचारलं गेलं की त्यांना क्रिस्टोफर नोलनं यांनी Tenet सिनेमाची स्क्रिप्ट कशी दाखवली होती? तेव्हा त्या म्हणाल्या होत्या,''दिग्दर्शकानं मला मेकअप वॅनमध्ये लॉक केलं होतं आणि माझ्या हातात सिनेमाची स्क्रिप्ट वाचायला दिली होती. जी वाचायला मला ४ तास लागले होते. डिंपल यांच्या म्हणण्यानुसार पहिली ५०पानं वाचल्यानंतरही त्यांना कळत नव्हते हे नक्की काय चाललं आहे? डिंपल म्हणाल्या की त्यांना उर्वरीत स्क्रिप्ट मधलं देखील काही समजलं नव्हतं,पण तरीही त्यांनी ती मन लावून वाचण्याचा प्रयत्न मात्र केला होता''.

पण डिंपल कपाडिया यांना तेव्हा मोठा धक्का बसला जेव्हा त्यांनी सिनेमातील आपले डायलॉग त्या स्क्रिप्ट मध्ये वाचले. त्यांच्या म्हणण्यानुसार ते संवाद इतके मोठे होते की काहीच लक्षात राहत नव्हतं. त्यांना वाटत होतं की हार्ट अटॅक येतोय की काय मला. अशा परिस्थितीत डिंपल कपाडिया यांनी आपली शक्कल लढवली होती.

यासंदर्भात बोलताना डिंपल कपाडिया म्हणाल्या होत्या,''मी माझा फोन पर्समधून बाहेर काढला आणि स्क्रिप्टमध्ये लिहिलेल्या माझ्या डायलॉगचा फोटो क्लिक केला. जेव्हा सिनेमाचा सह-निर्माता एंडी थॉमसन आला तेव्हा मी त्यांना माझी स्क्रिप्ट दिली आणि म्हटलं की हे बघ मी माझ्या संवादांचा फोटो क्लिक केला आहे''. तेव्हा तो म्हणाला,''तुम्ही असं नाही करू शकत''. तेव्हा मी म्हणाले,''मला स्क्रिप्ट द्या कारण माझ्या काही लक्षात नाही राहत आहे यातलं. आणि स्क्रिप्ट माझ्याकडे नसेल तर मी हे संवाद लक्षात नाही ठेवू शकत,कारण ते खूप मोठे आहेत. देवाचे आभार मानेन, की पू्र्ण वेळ फोटोच्या रुपात स्क्रिप्ट माझ्याजवळ होती आणि मी माझे डायलॉग लक्षात ठेवू शकले. पूर्ण शूट सिंगल शॉटमध्ये एका जंगलात होतं. आणि पू्र्ण संवाद त्या एका शॉट मध्ये बोलायचा होता''.

Tenet एक सायन्स-फिक्शन सिनेमा होता,जो २०२० मध्ये रिलीज झाला. सिनेमात रॉबर्ट पेंटिसन,एलिझाबेथ देबिक्की,मायकेल केन असे मोठे स्टार्स देखील होते. डिंपल कपाडियां यांनी १४ व्या वर्षी राजकपूर यांच्या १९७३ साली आलेल्या 'बॉबी' सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी 'दृष्टि','सागर','दिल चाहता है','रुदाली','गर्दिश','फिर कभी' अशा अनेक सिनेमांतून काम केलं. डिंपल कपाडियांना 'रुदाली' या सिनेमातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT