dinesh phadnis death news dinesh phadnis work in marathi movie bharla ha malvat raktana  SAKAL
मनोरंजन

Dinesh Phadnis: केवळ हिंदीच नाही तर या मराठी चित्रपटातही केलाय 'फ्रेडी'ने अभिनय

या मराठी सिनेमातली भूमिका फ्रेडीने गाजवलीय

Devendra Jadhav

Dinesh Phadnis: सी. आय. डी. (CID) फेम फ्रेडी म्हणजेच अभिनेते दिनेश फडणीस यांचं आज निधन झालंय. त्यांचं ५७ व्या वर्षी निधन झालं. दिनेश फडणीस यांनी साकारलेली सी.आय.डी. मालिकेतील फ्रेडीची भूमिका कमालीची लोकप्रिय ठरली.

दिनेश फडणीस हिंदी मालिका - सिनेमांमध्ये अभिनय केला. त्यांनी साकारलेल्या छोट्या भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहिल्या. दिनेश यांनी केवळ हिंदीच नाही तर मराठी सिनेमांमध्येही अभिनय केलाय.

दिनेश यांनी या मराठी सिनेमात केला अभिनय

दिनेश यांची CID मालिकेतील फ्रेडीची भूमिका लोकप्रिय झाली. अनेकांना माहित नसेल की दिनेश यांनी एका मराठी सिनेमातही केलाय. हा सिनेमा म्हणजे भरला हा मळवट रक्तानं.

१९९३ साली रिलीज झालेल्या या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन प्रदीप हळदणकर यांनी केलंय. प्रसाद आठल्ये, रविंद्र बेर्डे, सुहाल भालेकर, तुषार दळवी, नागेश भाेसले असे दिग्गज कलाकार या सिनेमात होते.

दिनेश फडणीस यांचं वर्कफ्रंट

दिनेश फडणीस यांनी 'सीआयडी'मध्ये अनेक वर्षे काम केले. 1998 ते 2018 पर्यंत त्यांनी फ्रेडरिकची भूमिका साकारली. याशिवाय 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्येही ते छोट्या भूमिकेत दिसले होते. शोमधील त्यांची फनी स्टाइल सर्वांनाच आवडली.

इतकंच नाही तर सीआयडी व्यतिरिक्त दिनेश यांनी अदालत, सीआयडी स्पेशल ब्युरो, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकांमध्येही अभिनय केलाय. याशिवाय ते आमिर खानच्या चित्रपट 'सरफरोश' आणि हृतिक रोशनच्या 'सुपर ३०'मध्येही दिसला होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT