निर्माती लीना मनिमेकलाईच्या(Leena Manimekalai) एका डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवर काली मातेला ज्या पद्धतीनं दाखवलं गेलं आहे,त्यामुळे सोशल मीडियावर(Social Media) तिखट प्रतिक्रिया दिल्या गेल्या आहेत. लीना विरोधात केल्या गेलेल्या तक्रारीत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला गेला आहे. तामिळनाडूच्या मदुराई शहरात लीनाचा जन्म झाला पण सध्या ती टोरंटो मध्ये वास्तव्यास आहे. लीनानं शनिवारी २ जुलै,२०२२ रोजी आपल्या सिनेमाचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला,ज्यात काली मातेच्या ड्रेसमध्ये एका महिलेला धुम्रपान करताना दाखवलं गेलं आहे. आणि त्यामागे लेस्बियन समाजाचा झेंडा देखील दाखवण्यात आला आहे.(Director Leena Manimekalai courts controversy with poster of her 'Kaali' film)
दिल्ली पोलिस आणि गृह मंत्रालयाला या संदर्भात केल्या गेलेल्या तक्रारीत गौ महासभेचे प्रमुख अजय गौतम यांनी सिने निर्माती लीना च्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची आणि सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली गेली आहे. यादरम्यान लीना मनिमेकलाईने आपल्या विरोधात सोशल मीडियावर प्रतिक्रियांच्या माध्यमातून जो विरोधात्मक सूर लावला जात आहे, त्याला उत्तर देताना एक ट्वीट केलं आहे.
तिनं त्यात म्हटलं आहे,''माझ्या जवळ मी गमवावं असं काहीच शिल्लक नाही. मला एका अशा आवाजासोबत जगायचंय,जिच्यात भीतीचा लवलेशही नसेल. जर याची किंमत माझे प्राण देऊन मोजावी लागणार असेल,तर मी त्यासाठी तयार आहे''.
निर्माती लीना हिच्याकडून केलेल्या ट्वीटनुसार हा सिनेमा टोरंटोमधील आगा खान म्युझियमच्या Rythms Of Canada च्या सेगमेंटचा एक भाग होता. तिनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,''आगा खान म्युझियममधील 'रिदम्स ऑफ कॅनडा'च्या एका सेगमेंटच्या रुपात माझ्या सिनेमाच्या लॉचिंगच्या क्षणाला शेअर करताना मला खूप रोमहर्षक भावना दाटून आल्या आहेत. यावेळी माझ्यासोबत माझे क्रु मेंबर्सही खूप उत्साही आहेत''.
लीनाच्या या काली सिनेमाचे पोस्टर शेअर झाल्यानंतर लगेचच ते वादात पडले आणि लोकांच्या ट्रोलिंगला सामोरे गेले. #ArrestLeenaManimekal असं ट्रेंड व्हायला लागलं. कितीतरी नेटकऱ्यांनी निर्माती लीना विरोधात कारवाई करण्याची आणि पोस्टरला रद्द करण्याची मागणी केला. एका पोस्टमध्ये लिहिलं गेलं की,'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हे सगळं सहन केलं जाणार नाही'.
तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'यावर त्वरित कारवाई करा,हिंदू देवतांचा हा अपमान आहे'. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'आता सुप्रीम कोर्टाला काही दिसत नाही का, दुजाभाव का?'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.