Mithali Raj sakal
मनोरंजन

'शाब्बास मितु'चरित्रपटाची निर्मिती श्रीजित मुखर्जी करणार!

नरेश शेंडे

भारतीय महिला टेस्ट आणि वनडे क्रिकेटच्या कर्णधार मिताली राज(Mithali Raj) यांच्या चरित्रपटावर(Biopic)आधारीत बहुप्रतिक्षेत असलेल्या 'शाब्बास मितु' सिनेमाच्या निर्मितीला कोरोनाची(Corona) झळ बसली आहे.या सिनेमात मिताली राज यांची व्यक्तिरेखा अभिनेत्री तापसी पन्नू(Tapasi Pannu) साकारणार आहे.

मुंबई :भारतीय महिला टेस्ट आणि वनडे क्रिकेटच्या कर्णधार मिताली राज (Mithali Raj) यांच्या चरित्रपटावर (Biopic)आधारीत बहुप्रतिक्षेत असलेल्या 'शाब्बास मितु' सिनेमाच्या निर्मितीला कोरोनाची (Corona) झळ बसली आहे.या सिनेमात मिताली राज यांची व्यक्तिरेखा अभिनेत्री तापसी पन्नू (Tapasi Pannu) साकारणार आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळं सिनेमाचं शुटिंगचं शेड्युल रखडलं आहे. त्यामुळं निर्माते व दिग्दर्शक राहूल ढोलकीया (Rahul Dholakia) यांनी सिनेमाचं यापुढील दिग्दर्शन करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी (Srijit Mukherjee) यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Director rahul dholakia leaves direction of shabbas mitu biopic of cricketer mithali raj handover to srijit mukherjee)

सोशल मीडियावर याबाबत अफवांच वादळं उठल्यानंतर राहुल यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून 'शाब्बास मितु'सिनेमाची यापुढील निर्मिती दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी करणार असल्याचं जाहीर केलंय.भारताची दिग्गज महिला कर्णधार मिताली राज यांच्या चरित्रपटाच्या मुख्य भूमिकेत तापसी पन्नू असणार आहे.

राहुल यांनी ट्विटरवर एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे.त्यात त्यांनी असं म्हटलय की,असे काही खास सिनेमा असतात ज्यांना करण्यासाठी तुमची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते.'शाब्बास मितु' हा सिनेमा त्यापैकीच एक आहे.जेव्हा मी या सिनेमाचं स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मी हा सिनेमा करण्याचा पक्का निर्धार दिड वर्षांपूर्वी केला होता.लेखक प्रिया अवेन यांनी लिहिलेल्या उत्तम दर्जाच्या स्क्रिप्टवर दिग्दर्शनाचं काम यापुढे मी करणार नाहीये. हे माझं दुर्दैव आहे.अजित अंधारे यांच्या कल्पनेतील हा सिनेमा असणार आहे.

राहुल यांनी यापुढे म्हटलंय की,मिताली राज यांच्यावर सिनेमा करणं म्हणजे एक पॅशन असल्यासारखं आहे.या सिनेमाच्या अनेक प्रेमळ आठवणी माझ्यासोबत जोडल्या गेल्या आहेत.त्यामुळं या सिनेमाचं दिग्दर्शन सोडलं असल्याची पोस्ट लिहिताना मी पुरता भावनिक झालो होतो.भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज यांचं चरित्रपट करणं म्हणजे 'द पॅशन ऑफ मिताली राज' जगासमोर प्रदर्शित करण्याचा माझा एक प्रयत्न होता.स्टुडिओ हेड अजित मांढरे यांनी कोरोना संकटकाळात तसंच लॅाकडाऊन मध्ये माझ्यासोबत

अनेकदा या सिनेमाविषयी चर्चा केली.लेखक प्रिया यांनीही काबाड कष्ट करत हा सिनेमा दर्जेदार कसा होईल याकडे लक्ष वेधलं.तसंच सिनेमातील भावनिक गोष्टी आणि क्रिकेट यांमधील ताळमेळ बसण्यासाठी त्यांनी कसून मेहनत घेतली आहे.तापसीनेही उत्तम क्रिकेट खेळण्यासाठी धडे गिरवले आहेत.तिच्यासोबत शुटिंग करताना मनाला एक विलक्षण आनंद व्हायचा. हा सिनेमा उत्तम दर्जाचा करण्यासाठी सर्व सहकारी,अभिनेते,खेळाडू यांचा मोलाचं योगदान देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या सिनेमाच्या पुढील दिग्दर्शनाची धुरा सांभाळणारे श्रीजित मुखर्जी हे या सिनेमाबाबत व्यक्त झाले आहेत.ते असं म्हणालेत,एक क्रिकेटप्रेमी आणि संशोधक म्हणून पाहत असताना मिताली राज यांच्याकडून अनेक प्रेरणा मिळतात.त्यांच्या व्यक्तिरेखेवर आधारीत सिनेमा येणार असल्याचं मला जेव्हा कळंल,त्यानंतर हा सिनेमा करावा अशी जबरदस्त उत्सुकता त्यावेळी माझ्यात होती आणि आत्ता मी याच सिनेमाचा एक भाग आहे.त्यामुळे लवकरच हा सिनेमा एक उत्कृष्ठ कहाणीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला पडद्यावर येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवळाकर याचं नाव जाहीर

रोहित, मैं आपसे बोहोत प्यार करती हूँ! मुलीच्या प्रपोजनंतर Rohit Sharma लाजला पण, पत्नी रितिका... Video Viral

गोफण | सुखाची झोप उडाली, वस्तादांचा मोठा गेम

'स्त्री 2' मधील कोरिओग्राफरचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार रद्द, लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे आयबी मंत्रालयाचा निर्णय

Body Wash: जर तुम्ही बॉडी वॉश वापरतायं? जाणून घ्या फायदे आणि तोटे

SCROLL FOR NEXT