Disha Vakani AKA 'Dayaben' From 'TMKOC' Attends A Navratri Event With Family Esakal
मनोरंजन

Disha Vakani Video: बऱ्याच वर्षानंतर 'दया बेन' कॅमेऱ्यासमोर दिसली! दिशा वकानीचा व्हिडिओ पाहून नेटकरी खुश

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम दया बेन म्हणजेच दिशा वकानी एका गरबा कार्यक्रमात दिसली, तिचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vaishali Patil

TMKOC Daya ben: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा लोकप्रिय शो गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांना आवडतात मात्र या मालिकेतील दया ची भुमिका साकारणारी दिशा वकानी ही जास्त लोकप्रिय झाली. गेल्या काही वर्षांपासून दया बेन या शोचा भाग नसली तरी तिचे चाहते तिच्या परतण्याची वाट पाहत आहेत.

नवरात्रीत तर दया बेनचा वेगळाच अंदाज पहायला मिळायचा. तिचा गरबा डान्स आजही प्रेक्षकांना आवडतो. गेली अनेक वर्षापासून मोठ्या पडद्यावरुन गायब राहिलेली अभिनेत्री दिशा वकानी ही नुकतीच एका गरबा पंडालमध्ये सहभागी झाली होती. तिचे या कार्यक्रमातील बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिशासोबत तिचा पती आणि मुलेही दिसले. यावेळी दिशाने क्रीम आणि गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे. अतिशय कमी मेकअपमध्ये ती सुंदर दिसत होती. इतक्या वर्षानंतर दिशाला पुन्हा कॅमेऱ्यासमोर पाहून चाहते खुश झाले. यावेळी दिशाने लेकीसोबत देवीचं दर्शन घेतले आणि सगळ्यांसोबत हसून गप्पा देखील मारल्या.

या व्हायरल व्हिडिओच्या कमेंटमध्ये तिच्या चाहत्यांनी तिला शो मध्ये परत येण्याची विनंती केली आहे. तर अनेकांनी तिच्या साधेपणाचं कौतुक करत आहे. तर अनेकांना जेठालालची आठवण आली आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेबद्दल बोलायचं झालं तर या शोमध्ये लवकरच दया परतणार अशा चर्चा होत्या. शोची यशस्वी 15 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, निर्मात्यांनी दया परणार अशी घोषणा केली मात्र नंतर याबाबत प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आता दिशा वकानी या शोमध्ये परतणार का हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT