मुंबई : 'सनातन' हा धर्म नसून ती एक जिवनपध्दती आहे. त्यामुळे जे लोक सनातन धर्माला पुढे नेण्यासाठी 'आदिपुरुष'ची निर्मीती केल्याचा दावा करत आहे. त्यांना सनातनचा अर्थच कळला नसल्याची टिका दिवंगत रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी 'सकाळ'शी बोलताना केला. आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लिहिणाऱ्या मनोज मुंताशिर शुक्ला यांनी आदिपुरुषमुळे सनातन धर्म पुढे जाणार असल्याचा दावा केला होता.
दिवंगत रामानंद सागर यांनी ३६ वर्षापुर्वी दूरदर्शनसाठी 'रामायण' या ऐतिहासिक, पौराणिक मालिकेची निर्मीती केली होती.प्रेम सागर यांनी या मालिकेच्या निर्मीतीसाठी वडीलांना सहाय्यक म्हणून काम केले होते.
आजच्या काळात अनेकांनी सनातनचा व्याख्या चुकीच्या पध्दतीने घेतली आहे.सनातन हा धर्म नसून ही एक जीवनपध्दती आहे. देवाचा शोध घेण्यासाठी त्यामध्ये माणसाला सर्वाधिक स्वातंत्र्य मिळते.त्यामध्ये मूर्ती पूजा, देवळात जाणे हे देखील बंधनकारक नाही. असे सांगत प्रेम सागर यांनी हल्ली सनातनचे राजकीयकरण झाले असल्याची टिका केली,
आदिपुरुष सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंताशिर शुक्ला यांचा मी सन्मान करतो मात्र या चित्रपटाच्या निर्मीतीत मोठी गुंतवणूक झाल्यामुळे त्यांनी सुरक्षित मार्ग निवडला असावा. त्यामुळे आजच्या पिढीसाठी या चित्रपटात टपोरी भाषा वापरली गेल्याचे प्रेम सागर यांनी सांगीतले. मात्र तूम्ही ग्रंथ, वेद, श्रीमतभागवत, रामायण यासोबत खेळ करु शकत नाही. रामाची प्रतिमा जनमाणसात आहे ती शेवटपर्यंत कायम राहील असेही प्रेम सागर यांनी सांगीतले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.