Dr Priya Dies Due To Cardiac Arrest while death dr. priya was pregnant malyalam tv actress SAKAL
मनोरंजन

Dr. Priya News: धक्कादायक! लोकप्रिय अभिनेत्रीचे दुःखद निधन; आठ महिन्यांची होती गरोदर

डॉ. प्रियाच्या दुर्दैवी निधनाने सर्वांनी हळहळ व्यक्त केलीय

Devendra Jadhav

Dr Priya Death News: अभिनेत्री डॉ. प्रियाच्या निधनाने मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीला आणखी एक धक्का बसलाय.

काहीच दिवसांपुर्वी अभिनेत्री रेंजुषा मेननच्या दुःखद निधनामुळे मल्याळम इंडस्ट्री शोकसागरात बुडाली होती. त्या धक्क्यातुन सावरते ना सावरते तोच डॉ. प्रियाच्या अकस्मात निधनाने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.

(Dr Priya Dies Due To Cardiac Arrest malyalam tv actress)

मल्याळम इंडस्ट्रीमधील लोकप्रिय मालिका करुथामुथू मधील भूमिकांसाठी डॉ.प्रिया ओळखली जात होती. वयाच्या ३५ व्या वर्षी अचानक हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याशिवाय तिच्या नवजात बाळाला ICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्याच येतंय.

मृत्यूच्या वेळी डॉ. प्रिया आठ महिन्यांची गरोदर होती, त्यामुळे चटका लावणारी एक्झिट अशा सर्वांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ती दैनंदिन रुटीन चेकअपला गेली असताना तिला हृदयविकाराच्या झटका आल्याने तिने अखेरचा श्वास घेतला. (Latest Marathi News)

अभिनेते किशोर सत्या यांनी ही बातमी चाहत्यांशी शेअर केली. त्यांनी प्रियाच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला कुटुंबाप्रती हळहळ व्यक्त केली. किशोर म्हणतात, "इंडस्ट्रीतील एक परिचित चेहरा असलेल्या डॉ. प्रिया यांनी 31 ऑक्टोबर रोजी एका खाजगी रुग्णालयात जगाचा निरोप घेतला. तिच्या आई - वडिलांना आणि पतीला प्रियाच्या निधनाने मोठा धक्का बसलाय. ६ महिने प्रिया कुठेही गेली नव्हती. तिला दुसरा कोणताही आजार नव्हता."

लग्नानंतर इंडस्ट्रीतून ब्रेक घेतलेल्या 35 वर्षीय अभिनेत्री, व्यवसायाने डॉक्टर होत्या. रुटीन चेकअरला गेल्या असता त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. ज्यामुळे तिचे कुटुंब आणि संपुर्ण टीव्ही इंडस्ट्री हादरून गेलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT