Dr.Amol Kolhe: डॉ.अमोल कोल्हे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका हे एक समीकरण आहे. अनेक कलाकारांनी नाटक,मालिका, सिनेमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली आहे. पण डॉ.अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका लोकांना काकणभर अधिकच भावली असं म्हटलं तर नक्कीच चूकीचं ठरणार नाही.
बरं..डॉ. अमोल कोल्हे आता राजकारणात सक्रिय असले तरी त्यांनी मनोरंजन विश्वापासून दूरी बनवलेली नाही. मग मालिकांची निर्मिती असो किंवा स्वतः नाटक,सिनेमात काम करणं असो..ते नेहमी यामाध्यमातून आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस येतात.
नुकताच एक व्हिडीओ त्यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर पोस्ट केला आहे..ज्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा गेल्या १६ वर्षापासून दांडगा अनुभव गाठी असूनही त्यांना रिजेक्शनचा सामना करावा लागला आणि तो का करावा लागला याचा देखील खुलासा केला आहे. (Dr.Amol Kolhe actor and politician Rejection for Chatrapati Shivaji maharaj Role video viral )
डॉ. अमोल कोल्हे यांचा स्वतःचा युट्युब चॅनेल आहे,ज्यावर ते नेहमी व्हिडीओ पोस्ट करताना दिसतात. नुकताच पोस्ट केलेला त्यांचा व्हिडीओ पाहून मात्र लोक हैराण होताना दिसत आहेत. कारण इतकी वर्ष छत्रपती शिवाजी महाराज म्हणून भूमिका साकारल्यानंतर जे लोकांचे अभिनयक्षेत्रातील आवडते शिवाजी महाराज बनले आहेत त्यांना त्याच भूमिकेसाठी रिजेक्ट कसं काय केलं जाऊ शकतं हा प्रश्न व्हिडीओ पाहून प्रत्येकाला पडतोय. आता यामागचं कारणही डॉ.अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे.
डॉ. अमोल कोल्हे आपल्या व्हिडीओत म्हणालेयत, ''रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एक लाइट अॅन्ड म्युझिक शो होणार होता. तेव्हा शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेला आवाज द्याल का अशी मला विचारणा झाली. महाराजांचे काम असल्यामुळे मी मागचा-पुढचा कोणताच विचार न करता हो म्हटलं''.
''मानधनाची विचारणा झाली तेव्हा म्हटलं,बंद पाकिटात जे द्याल ते प्रेमानं स्विकारेन. त्यानंतर कार्यक्रमाच्या पाच ते सहा दिवस आधी मला कॉल करुन सांगण्यात आलं की,तुमचा आवाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेला सूट होत नाही..आणि अशाप्रकारे मला रिजेक्ट करण्यात आलंटट.
''तेव्हा सुरुवातीला हे ऐकून मी हैराण झालो..हे कसं शक्य आहे..पण नंतर कळलं की सरकारी कार्यक्रम असल्यानं सगळी सूत्र वरनं हलली आहेत...मग मात्र मी विषय समजून तो सोडून दिला. पण एक प्रश्न मात्र माझ्या मनात निर्माण झाला तो म्हणजे कलाकार आणि राजकारण याची सरमिसळ का करतात? मी राजकारणात आहे हा माझा गुन्हा आहे का ज्यामुळे माझ्यातल्या कलाकाराला नाकारलं जातंय?''
डॉ. अमोल कोल्हेंचा हा व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.