dream girl 2 bihar police thanks and best wishes to ayushmann khurrana for his social message samastipur SAKAL
मनोरंजन

Dream Girl 2: बिहार पोलिसांनी आयुष्मान खुरानाचे मानले आभार, हे आहे खास कारण

बिहारच्या समस्तीपूर पोलिस युनिटने या कारणासाठी आयुष्मान खुरानाचे आभार मानले आहेत

Devendra Jadhav

Dream Girl 2 Ayushmann Khurrana News: सध्या सगळीकडे चर्चा आहे ड्रीम गर्ल 2 सिनेमाची. आयुष्ममान खुरानाच्या ड्रीम गर्ल 2 सिनेमाच्या ट्रेलरने सोशल मिडीयावर अक्षरशः धुमाकुळ घातला. या आठवड्याच्या सुरुवातीला रिलीज झालेला ड्रीम गर्ल 2 ट्रेलर खूप चर्चेचा विषय ठरतोय.

संवेदनशील कवी आणि अभिनेता असलेल्या आयुष्मान खुरानाचे आभार चक्क बिहार पोलिसांनी मानले आहेत. आता, बिहारच्या समस्तीपूर पोलिस युनिटने आयुष्मानचे त्याच्या ड्रीम गर्ल अवतारसाठी कौतुक केले आहे. काय आहे कारण जाणुन घेऊ.

(dream girl 2 bihar police thanks and best wishes to ayushmann khurrana)

बिहार पोलिसांनी आयुष्मानचे मानले आभार

आयुष्मानचा ड्रीम गर्ल 2 सिनेमा जितका मनोरंजक आहे तितकाच संवेदनशील सुद्धा. या सिनेमातुन एक महत्वाचा संदेश जातोय तो म्हणजे सायबर क्राईम.

ड्रीम गर्ल 2 चित्रपटातील पूजा या पात्राच्या भूमिकेत सायबर फसवणूकीचा प्रसार करण्यास मदत जातेय, म्हणुन बिहार पोलिसांनी आयुष्यानचे आभार मानले आहेत.

बिहार पोलिसांनी आयुष्मानला टॅग करुन ट्विट केले आहे की, “या चित्रपटाची कथा सायबर फसवणुकीविरुद्धच्या आमच्या लढ्यात आश्चर्यकारकपणे आम्हाला मदत करतेय. तुमची कृती वास्तविक सायबर फ्रॉड कॉलच्या अगदी जवळ नेणारी आहे. कृपया अशीच जनजागृती करत रहा. शुभेच्छा आणि समस्तीपूरमध्ये आपले स्वागत आहे.”

भारताचा कंटेंट क्रिएटर म्हणजे आयुष्मान खुराना

आयुष्मान खुरानाने आज भारतात चांगल्या कंटेंट सिनेमाचा 'पोस्टर बॉय' म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याच्या ब्लॉकबस्टर सोशल एंटरटेनमेंट सिनेमांनी उघडपणे न बोलले जाणारे विषय सार्वजनिक जीवनात चर्चेसाठी आणले आहेत.

आता समस्तीपूर पोलिसांनी सुद्धा ड्रीम गर्ल 2 मधील सामाजिक विषयासाठी आयुष्मान खुरानाचं कौतुक केले आहे.

ड्रीम गर्ल 2 ची रिलीज डेट

ड्रीम गर्ल 2 चित्रपट मनोरंजन करणारा आणि त्याच वेळी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांच्या मानसिकतेत एक मोठे प्रबोधन करणारा ठरेल. ड्रीम गर्ल 2 चा ट्रेलर मिलियनच्या पार व्ह्यूज मिळाले आहेत. हा चित्रपट 2019 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट ड्रीम गर्लचा सिक्वेल आहे. एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी चित्रपटाती निर्मिती केली तर राज शांडिल्य दिग्दर्शिन केलं आहे.

आयुष्मान खुरानाची प्रमुख भुमिका असुन अनन्या पांडे, परेश रावल, अन्नु कपूर यांची प्रमुख भुमिका असलेला हा सिनेमा 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT