eam Girl 2 box office collection day 2 Esakal
मनोरंजन

Dream Girl 2: 'वो बुलाती है...' दुसऱ्या दिवशी ड्रिम गर्लनं उडवली झोप! जमवला इतक्या कोटींचा गल्ला..

Vaishali Patil

Dream Girl 2 box office collection day 2: राज शांडिल्य दिग्दर्शित आणि बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. 2019 मध्ये आलेल्या 'ड्रीम गर्ल' चा हा सिक्वेल आहे. या चित्रपटात आयुष्मानने पूजा बनत पुन्हा टेलिफोनची रिंग वाजवली आहे.

आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा कॉमेडी ड्रामा चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'ड्रीम गर्ल 2' ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 कोटींची कमाई केली आहे, अशा प्रकारे चित्रपटाने 2 दिवसांत एकूण 24.69 कोटींची कमाई केली आहे.

'ड्रीम गर्ल 2'ने पहिल्याच दिवशी चांगली कमाई करत भन्नाट ओपनिंग केली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 10.69 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेदेखील समोर आले आहेत. 'ड्रीम गर्ल 2' हा आयुष्मान खुरानाच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. .

दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर हे आकडे वाढले आहेत. ड्रीम गर्ल 2 ने दुसऱ्या दिवशी 14 कोटींची कमाई केली आहे. यासह दोन दिवसांची एकूण कमाई 24.69 कोटींवर गेली आहे.

ड्रीम गर्ल 2 हा सिनेमा केवळ 35 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता चित्रपटाने केवळ दोन दिवसातच निम्म्याहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरणार आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चित्रपटात पाहिल्यानंतर सर्वांनीच आयुष्मानच्या कामाचे कौतुक केले आहे.

'ड्रीम गर्ल 2' हा आयुष्मान खुरानाच्या 2019 मध्ये आलेल्या 'ड्रीम गर्ल' चित्रपटाचा सिक्वेल आहे. याचित्रपटात सिनेमात आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे परेश रावल, अनु कपूर, राजपाल यादव, असरानी, ​​सीमा पाहवा, विजय राज, मनजोत सिंग, अभिषेक बॅनर्जी, रंजन राज, मनोज जोशी यांनी प्रेक्षकांचे खुप मनोरंजन केले आहे.

सनी देओलचे गदर 2 आणि OMG 2 11 ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता. या दोघांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली तर 18 ऑगस्ट रोजी अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांचा चित्रपट घूमर प्रदर्शित झाला मात्र तो काही खास कमाल करु शकला नाही. त्यातच आता 'ड्रीम गर्ल 2' ने आता बॉक्स ऑफिसवर चांगली कमाल करत आहे त्यामुळे आता हा सिनेमा आता किती कोटींचा टप्पा पार करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT