Dream Girl 2 BO Collection Day 6 Esakal
मनोरंजन

Dream Girl 2 BO: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर 'ड्रिम गर्ल 2' ने घेतली मोठी झेप! केली इतक्या कोटींची कमाई..

Vaishali Patil

Dream Girl 2 BO Collection Day 6: सध्या मनोरंजन विश्वात एका सिनेमाची खुपच क्रेझ आहे. तो सिनेमा म्हणजे 'ड्रीम गर्ल 2' या सिनेमाने 25 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एंट्री मारली आणि एका आठवड्याच्या आतच बजेटच्या वर कमाई केली. आयुष्मान खुराना स्टारर या सिनेमानं पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली होती.

त्याचबरोबर या सिनेमाने ओपनिंग वीकेंडलाही चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा पार केला आता रिलिजच्या सहाव्या दिवशी सिनेमाने किती कोटींची कमाई केली याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या अशातच आता बुधवारी म्हणजेच रक्षाबंधनच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे दिसून आले.

एकीकडे सनी देओलच्या 'गदर 2' आणि अक्षय कुमारच्या 'OMG 2' हे बिग बजेट सिनेमे असतांनाही आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल'2 ने प्रेक्षकांना भुरळ घातली. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवार आणि मंगळवारी चित्रपटाच्या कमाईचा आलेख उतरला होता मात्र सहाव्या दिवसाशी कमाईचा आलेख वाढला. पहिले दोन दिवस या चित्रपटाची कमाई 5.42 कोटी आणि 5.87 कोटी रुपये होती. तर आता चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर आले. रक्षाबंधनाच्या दिवशी 'ड्रीम गर्ल 2' च्या कमाईत मोठी वाढ झाली आहे.

रिलिजच्या सहाव्या दिवशी 'ड्रीम गर्ल 2'ने बॉक्स ऑफिसवर तब्बल 7.75 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. या सहाव्या दिवसाच्या कमाईच्या आकडेवारी नुसार आता ड्रिम गर्लने 6 दिवसांत एकूण कमाई आता 59.75 कोटी रुपये कमावले आहे.

'ड्रीम गर्ल 2' च्या कमाईत जशी वेगाने वाढ होत आहे त्यानुसार हा सिनेमा लवकरच बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

'ड्रीम गर्ल 2' मधील कलाकारांबद्दल बोलायचं झाल्यास यात आयुष्मान खुराना व्यतिरिक्त अनन्या पांडे, अन्नू कपूर, परेश रावल, अभिषेक बॅनर्जी, विजय राज, असरानी, ​​मनोज जोशी आणि सीमा पाहवा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट फुल फॅमिली ड्रामा आहे. ज्यात आयुष्मान खुरानाने पुजाची भुमिका साकरली आहे. 2019 मध्ये रिलीज झालेल्या ड्रीम गर्लचा हा सिक्वेल आहे. ज्याला प्रेक्षकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT