Farhan Akhtar News: अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर हा देखील गायक आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणीही गायली आहेत. फरहानचा स्वतःचा एक बँड देखील आहे, ज्यांच्या मैफिली वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केल्या जातात.
या महिन्यात ऑस्ट्रेलियात फरहानच्या बँडची एक मैफल होणार होती जी आता रद्द करण्यात आली आहे. खुद्द अभिनेत्यानेच जड अंत:करणाने ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
(Due to this reason fans went angry on Farhan Akhtar saying.. return our money)
काही कारणांमुळे त्याचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक दौरा रद्द झाल्याने फरहान खूप निराश झाला आहे. फरहानने इंस्टाग्रामवर एक लांबलचक भावुक पोस्ट टाकली आहे.
फरहान अख्तरने इन्स्टाग्रामवर त्याचा कॉन्सर्ट रद्द झाल्याची माहिती दिली. फरहान लिहितो.. माझे ऑस्ट्रेलियाचे चाहते. काही कारणांमुळे आमच्या बँड फरहान लाइव्हला त्याचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द करावा लागला आहे.
या आठवड्याच्या शेवटी आम्ही सिडनी आणि मेलबर्नला जाऊ शकणार नाही. मी माझी निराशा तुमच्यासोबत शेअर करतोय.
आम्ही आशा करतो की भविष्यात कधीतरी तुमच्या सुंदर शहरात येऊन तुमच्यासाठी सादरीकरण करू. तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम. अशी पोस्ट करून फरहानने दुःख व्यक्त केलंय.
या पोस्टखाली चाहते फरहानला आपापल्या प्रतिक्रिया देऊ लागल्या. "आम्हाला आमचे पैसे कसे परत मिळतील?", "मित्रा. आम्ही तुम्हाला भेटण्याची वाट पाहत होतो.", "आम्ही खूप उत्साही होतो. तिकिटेही घेतली होती."
याशिवाय काहींनी त्याला शेवटच्या क्षणी कार्यक्रम रद्द करण्यामागेडॉन ३ चं शूटिंग कारणीभूत आहे का असा प्रश्न विचारला.
फरहान अख्तर आगामी काळात पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसणार असून तो कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रासोबत 'जी ले जरा' हा सिनेमा बनवत आहे.या सिनेमाचे अद्याप शूटिंग वगैरे सुरू झालेले नाही.
याशिवाय फरहान 'खो गये हम कहाँ' सिनेमाची निर्मिती करत आहे. यामध्ये अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव असे कलाकार दिसणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.