Ekta Kapoor Tv entertainment celebrity angry question on marriage esakal
मनोरंजन

Ekta Kapoor Angry : 'मुलगी लग्न करते तेव्हाच सेटल होते असे लोकांना का वाटते? मुलांना का बरं असं विचारत नाही?'

एकता कपूरला त्या पापाराझ्झींनी लग्नावरुन प्रश्न विचारला आणि एकताचा संताप झाला. तिला त्या प्रश्नावरुन खूपच राग आला.

युगंधर ताजणे

Ekta Kapoor Tv entertainment celebrity angry question on marriage : टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर ही नेहमीच चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. सध्या तिला पापाराझ्झींनी लग्नावरुन प्रश्न विचारला आणि एकता कपूरचा संताप झाल्याचे दिसून आले आहे.

मनोरंजन विश्वात आपल्या नावाची वेगळी ओळख तयार करण्यात एकता कपूरचे नाव आघाडीवर आहे. तिनं बालाजी टेलिफिल्मसच्या माध्यमातून आपण भारतातील टीव्ही आणि चित्रपट मनोरंजन विश्वातील मोठी सेलिब्रेटी आहोत हे दाखवून दिले आहे. एकता ही अनेकदा तिच्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. ती आपल्या परखड भूमिकांसाठी परिचित असते.

Also Read - Dahi Handi - गुंतवणुकीची उतरंड कशी हवी याचा धडा देणारा उत्सव

एकता कपूरला त्या पापाराझ्झींनी लग्नावरुन प्रश्न विचारला आणि एकताचा संताप झाला. तिला त्या प्रश्नावरुन खूपच राग आला. दरवेळी नको त्या प्रश्नावरुन का लक्ष्य करत असता, या प्रश्नांनी तुम्हाला काय साध्य करायचे असते, अशा प्रकारे तिनं आपला राग व्यक्त केला आहे. क्योकी की सास भी कभी बहू थी, बडे अच्छे लगते है, कुमकुम भाग्य सारख्या लोकप्रिय मालिकांची निर्माती म्हणून एकताचे नाव घेतले जाते.

याशिवाय बॉलीवूडमधील कित्येक बड्या चित्रपटांची निर्मिती एकतानं केली आहे.सध्याच्या घडीला हिंदी चित्रपट विश्वातील सर्वात मोठी निर्माती म्हणून ओळखली जाते. सध्या एकता ही तिच्या आगामी थँक यू फॉर कमिंग नावाच्या चित्रपटावरुन चर्चेत आली आहे. त्यावेळी तिला तिच्या लग्नावरुन प्रश्न विचारण्यात आला होता.

मला नेहमीच लग्नावरुन प्रश्न विचारण्यात येतो. मॅडम तुम्ही केव्हा सेटल होणार असे विचारले जाते. तो प्रश्न ऐकल्यावर मला एवढा राग येतो की, काय बोलावे हेच कळत नाही. लोकांना कसं सांगू की मी सेटल झाली आहे. मला अजून किती सेटल व्हावे लागणार आहे हेच कळत नाही. लोकांना असं वाटतं की, बाई लग्न करते तेव्हाच सेटल होते असे लोकांना का वाटते? लग्न करणं खरच गरजेचं आहे का?

मुली काय लग्नाशिवाय जगू शकत नाही का, अनेकांना असे का वाटते की, मुलींनी लग्न करायलाच हवे. आयुष्य सेट होण्यासाठी लग्नचं करायला हवे असे काही नाही. हेच प्रश्न तुम्ही मुलांनाही विचारु शकता, सलमान भाईला देखील असे प्रश्न विचारले जातात की, लग्न कधी करणार म्हणून?

थँक यु फॉर कमिंग विषयी बोलायचे झाल्यास त्यात भूमि पेडणेकर, शहनाज गिल, डॉली सिंह, कुशा कपिला, शिबानी बेदी, प्रद्युम्न सिंह मॉल, नताशा रस्तोगी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : पर्थ कसोटी जिंकताच गौतम गंभीर तातडीने मायदेशात परतला, नेमकं असं काय घडलंय?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे 11 वाजता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

Instagram New Feature : इंस्टाग्राममध्ये 3 धमाकेदार फीचर्सची एंट्री! पटकन बघून घ्या नवं अपडेट

Shashi Ruia Passes Away: एस्सार समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचे निधन

म्हणून अर्जुन आणि मलायकाचा झाला ब्रेकअप ; 'हे' होतं कारण

SCROLL FOR NEXT