Elon Musk, Elon Musk twiter, Elon Musk removed indian celebirities blue tick, abhishek bachchan, priyanka chopra, alia bhatt, amitabh bachchan, shah rukh khan SAKAL
मनोरंजन

Elon Musk Twitter: एलन मस्कने फिरवली छडी.. दिग्गज सेलिब्रिटींचं ब्लु टिक घेतलं हिसकावून

एलन मस्कने लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींचं ट्विटर अकाउंटवरून ब्लु टिक काढलंय

Devendra Jadhav

Elon Musk Removed Indian Celebrities Twitter Blue Tick News: एलन मस्क हा ट्विटरचा मालक आहे. एलन मस्कने आजवर ट्विटरवर नवनवीन प्रयोग केले. एलन मस्कचे नवनवीन प्रयोग पाहून सर्वांना घाम फुटलाय.

आता एलन मस्कने एक अशी गोष्ट केलीय ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एलन मस्कने सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींचं ट्विटर अकाउंटवरून ब्लु टिक हिसकावून घेतलीय. त्यामुळे सर्वांना धक्का बसलाय.

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

(elon musk removed twitter blue tick of indian celebrities like shah rukh khan, priyanka chopra, amitabh bachchan)

दरम्यान, गुरुवारी एलनने.. शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा याशिवाय एम. एस. धोनी, विराट कोहली असे क्रिकेटपटू आणि राजकीय दिग्गजांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अकाउंटवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आले.

या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. तर हा ब्लू टिक ट्विटरवर ट्रेंड होत आहे. काही स्टार असे आहेत ज्यांच्या अकाउंटवरून ब्लू टिक काढलेली नाही.

ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी घोषणा केली होती की २० एप्रिलपासून, सर्व लेगेसी वेरिफाईड अकाउंटवरुन ब्लू टिक काढून टाकले जाईल.

त्याचबरोबर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अशा व्यक्तींना हव्या त्या सुविधेसाठी पैसे मोजावे लागतील.

यामुळे आज म्हणजेच 21 एप्रिलला सकाळी अनेक सेलिब्रिटींच्या अकाउंटवरून ब्लू टिक हटवण्यात आली आहे. आणि एलनने त्याचं म्हणणं खरं करून दाखवलं.

ब्लू टिक काढण्यात आलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, बिपाशा बसू, अर्जुन रामपाल, अनुष्का शर्मा आणि फराह खान अशा अनेक स्टार्सची नावे समाविष्ट आहेत.

परंतु अनुपम खेर - सोनम कपूर आणि अन्य बॉलिवूड सेलिब्रिटींचे ब्लू टिक्स काढलेले नाही.

तर साऊथ इंडस्ट्रीमधील सुरिया, महेश बाबू, ज्युनियर एनटीआर, एसएस राजामौली, नागार्जुन अक्किनेनी, राणा दग्गुबती या स्टारचे ब्लू टिक काढण्यात आलेले नाही.

आता कोणाला ब्लु टिक हवी असेल तर अशा सेलिब्रिटींना ठराविक पैसे मोजावे लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT