Elvish Yadav Bail: एका पार्टीत सापाचे विष पुरवल्या प्रकरणात यूट्यूबर एल्विश यादव याला जामीन मिळाला आहे. गौतम बुद्ध नगर जिल्हा न्यायालयाने ५० हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर एल्विश यादवला जामीन मंजूर केला आहे. एल्विश यादव यांचे वकील दीपक भाटी यांनी ही माहिती दिली आहे.
एल्विश यादवला गौतम बुद्ध नगर जिल्हा न्यायालयातून जामीन मिळाला, मात्र एल्विशची सुटका रखडली आहे. हरियाणा कोर्टाच्या प्रोडक्शन वॉरंटमुळे हा प्रकार घडला आहे.सुटकेची परवानगी तुरुंगात पोहोचल्यानंतर कारागृह प्रशासनाने सुटका करण्यास नकार दिला. गुरुग्राम पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंट मागितले आहे, एल्विश यादवला शनिवारी गुरुग्राम न्यायालयात हजर केले जाईल, असे तुरुंग अधीक्षकांनी सांगितले.
एल्विशचे वकील म्हणाले, आम्ही कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. आम्ही जामीन बाँडच्या तात्पुरत्या मंजुरीसाठी अर्ज करू जेणेकरून लवकरात लवकर सुटका आदेश जारी केला जाऊ शकेल. उद्यापासून होळी असल्याने तो आज रात्री जारी केला जाऊ शकतो किंवा काही दिवस लागू शकतात. सुट्ट्यांमुळे न्यायालय बंद राहील.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस ओटीटी २ या रिॲलिटी शोचा विजेता असलेल्या २६ वर्षीय वादग्रस्त युट्युबरवर नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा आणि कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.