बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादवच्या आयुष्यात धक्कादायक प्रकार घडलाय. वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाल्यानंतर प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता ठरला.
राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या एल्विश यादवला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. आणि त्या व्यक्तीने एल्विशकडे भलतीच मागणी केलीय. काय घडलंय नेमकं पाहा.
(elvish yadav unknown call and demand 1 crore extortion from haryana gurugram)
एल्विश यादवला आला अज्ञात व्यक्तीचा फोन, मग पुढे...
एल्विश यादवला अज्ञात कॉलद्वारे एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याची धक्कादायक घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार, एल्विश यादव यांच्या फिर्यादीवरून खंडणीची मागणी करणाऱ्या अज्ञात गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावाजवळ फोन आला, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, एल्विश यादवला 25 ऑक्टोबर रोजी खंडणीचा कॉल आला होता. याबाबत माहिती देताना एल्विश यादव म्हणाला की, 25 ऑक्टोबर रोजी एल्विश यादव वजिराबाद गावाजवळ पोहोचला असता एका अज्ञात त्याला फोन केला.
फोनवरुन त्या व्यक्तीने एल्विशकडे एक कोटी रुपये देण्याची मागणी केली. एल्विशच्या म्हणण्यानुसार हा कॉल कोणी केला याबद्दल त्याला कोणतीही माहिती नाही. त्यानंतर एल्विशने गुरुग्रामच्या सेक्टर 53 पोलिस ठाण्यात या संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे.
अज्ञात व्यक्तीवर कलम 358 अन्वये गुन्हा दाखल
एल्विश सांगतो की, अज्ञात कॉलरने खंडणीच्या पैशाची मागणी केल्यानंतर त्याने 25 ऑक्टोबर रोजी गुरुग्रामच्या सेक्टर 53 पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून याप्रकरणी तक्रार दाखल केली.
त्याचबरोबर या प्रकरणी कलम 358 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस पथकाने हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला आहे.
एल्विशच्या नंबरवर आलेल्या अनोळखी कॉलरचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक फोन नंबरचा तपशील मिळवत आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू असल्याने तो अज्ञात व्यक्ती कोण याचा लवकरच उलगडा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.