प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळा न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात कला आणि मनोरंजन विश्वातील जगभरातील कलाकारांना 14 विविध श्रेणींसाठी नामांकन मिळाले होते. या पुरस्कार सोहळ्यात OTT प्लॅटफॉर्मचाही सहभाग होता.
या पुरस्कार सोहळ्यात कॉमेडियन वीर दास याला 'वीर दास लँडिंग'साठी एमी इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वीर दासने आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड जिंकून इतिहास रचला आहे. त्याने हा पुरस्कार ब्रिटिश किशोर सिटकॉम डेरी गर्ल्ससोबत शेअर केला आहे.
वीर दास हा प्रसिद्ध कॉमेडियन, अभिनेता आणि संगीतकार आहेत. त्यांने 35 नाटकं, 100 हून अधिक स्टँड-अप शो यासोबतच 18 चित्रपट, आठ टीव्ही शो आणि सहा कॉमेडी स्पेशलमध्ये शोमध्ये काम केले आहे.
दिल्ली बेलीसारख्या चित्रपटामुळे त्याला खरी ओळख मिळाली. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे नॉमिनेशन मिळाले होते. गो गोवा गॉन, नमस्ते लंडन, लव्ह आज कल आणि शिवाय या हिट सिनेमांमध्ये वीरने काम केले आहे.
यासोबतच वीर दास हा द कर्स ऑफ किंग टुट टॉम्ब, मुंबई कॉलिंग, व्हिस्की कॅव्हेलियर आणि फ्रेश ऑफ द बोट मध्ये दिसला आहे. कॉमेडी शोमध्ये हसमुख, एब्रॉड अंडरस्टँडिंग, लूजिंग इट, वीर दास: इनसाइड आउट आणि वीर दास: आउटसाइड इन हे त्याचे कॉमेडी शो आहेत.
एमी अवॉर्ड 2023 ने सन्मानित 'वीर दास लँडिंग' ही सिरिज कोणत्या OTT वर पाहता येणार हे जाणुन घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
वीर दास लँडिंग बद्दल सांगायचं झालं तर हा एक कॉमेडी स्पेशल अनस्क्रिप्टेड स्टँड अप कॉमेडी शो आहे. या शोमध्ये कॉमेडियन वीर दास विनोद सांगण्याबरोबरच त्याच्या आयुष्याबद्दल आणि अनुभवांबद्दल बोलतो. हा कॉमेडी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रसारित होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.