emraan hashmi  
मनोरंजन

'सिरियल किसर' कसा झालो? अभिनेता इमरान हाश्मीची गोष्ट...

बॉलीवूडमध्ये bollywood बोल्ड सीन bold sceneदेणाऱ्या अभिनेत्री आपल्याला माहिती आहेत.

युगंधर ताजणे

बॉलीवूडमध्ये bollywood बोल्ड सीन bold sceneदेणाऱ्या अभिनेत्री आपल्याला माहिती आहेत. तसे काही अभिनेतेही आहे. त्यात इमरान हाश्मीच्या emraan hashmi नावाचा उल्लेख करावा लागेल. त्यानं आपल्या सुरुवातीच्या काळात एक अभिनेत्यापेक्षा एक सिरियल किसर म्हणून बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण केली. त्यानं तो प्रसिद्धही झाला. त्याचा स्वतंत्र प्रेक्षकवर्गही त्यानं निर्माण केला. सध्या त्याचा चेहरे नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याची चर्चा आहे. या चित्रपटामध्ये इमराननं पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं आहे. त्याचा त्याला विशेष आनंदही आहे. त्यानं एका मुलाखतीमध्ये बिग बी यांच्यासोबत काम करतानाच्या आठवणींना उजाळा दिला होता. इमरानला नेहमीच सिरियल किसर serial kisser म्हणून ओळखलं गेलं. त्याविषयीही त्यानं सांगितलं आहे.

एका मुलातीमध्ये इमराननं सांगितलं होतं की, आता मी किसिंग सीनला वैतागलो आहे. जेव्हा बॉलीवूडमध्ये आलो होतो तेव्हाही मला त्याच प्रकारच्या फिल्मस मिळाल्या. तेव्हा मी त्या स्वीकारल्या. दिग्दर्शक आणि कथेची गरज यामुळे मी ते सीन दिले. मात्र माझी अभिनेता म्हणून प्रतिमा वेगळी समोर आली आहे. यापूर्वी कोणत्याही अभिनेत्याला अशाप्रकारच्या कौतूकाला आणि टीकेला सामोरं जावं लागलं नव्हतं. याची आठवण करु द्यावीशी वाटते. असेही इमराननं यावेळी सांगितलं. खरं सांगायचं झाल्यास तेव्हा मी मलाच त्या सिरियल किसरचा टॅग दिला होता. त्यानंतर माध्यमांमधून त्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्यांना उधाण आले होते. आणि त्याची वेगळ्या प्रकारे चर्चाही सुरु झाली.

मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला त्या दहा वर्षांमध्ये अनेक किसिंग सीनच्या फिल्मस केल्या. २००३ मध्ये तो माझा प्रवास सुरु झाला. माझ्या चित्रपटामध्ये मी ज्या अभिनेत्रींसोबत काम केले त्या प्रत्येक अभिनेत्रीला मी किस केले होते. अशीही आठवण यावेळी इमराननं सांगितली. त्यामुळे कदाचित माझी प्रतिमा इतर अभिनेत्यांपेक्षा थोडी वेगळी झाली. माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही अनेकांचा बदलला. मला त्या प्रतिमेतून बाहेर पडायचं होतं. मी त्या दृष्टीनं प्रयत्नही सुरु केला. पण त्यात मला फार लवकर यश आले नाही.

बॉलीवूडमध्ये तेव्हा त्या प्रकारचे बोल्ड सीन देणं हे वेगळ्या प्रकारचे मानले जात होते तेव्हा मी हे धाडस केलं होतं. अनेकांनी तेव्हा मला सल्लाही दिला होता की हे चूकीचं आहे. मात्र मला ते आव्हान स्वीकारायचं होतं आणि मी ते पूर्ण केलं. कालांतरानं मला जाणवलं की, आता आपण त्या भूमिकेतून बाहेर पडण्याची गरज आहे. आणि मी ते त्यातून बाहेर पडतो आहे. असे मला वाटते. अशीही प्रतिक्रिया इमराननं दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकीय पक्ष मेले तरी... निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य, शरद पवारांवरही घणाघात

Latest Maharashtra News Updates : पुण्याच्या कॅन्टोन्मेंट मतदार संघात रेवंत रेड्डीचं तेलगू भाषेत भाषण; मोदींवर केली टीका

Maratha Reservation: सरकार नालायक, तरुण जीव संपवतायेत; मनोज जरांगेंचा संताप....!

Milind Soman runs barefoot: मिलिंद सोमण नुकतेच धुक्यात अनवाणी पायांनी पळताना दिसले. पण खरंच हे शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात.

IPL 2025: मुंबईचा कोच आता RCB मध्ये सामील; 18 व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT