Prakash Raj  SAKAL
मनोरंजन

Prakash Raj: प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी ईडीचं समन्स, काय आहे प्रकरण?

Sandip Kapde

Prakash Raj : प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या चाहत्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे प्रकाश राज यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) समन्स जारी केला आहे. आपल्या परखड वक्तव्यांसाठी आणि बिनधास्त अंदाजासाठी प्रकाश राज हे ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी अनेकदा सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ते चर्चेत राहिले आहे.

पॉन्झी योजनेशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांना समन्स जारी केले. याआधी ईडीने तामिळनाडूतील त्रिची येथील प्रणव ज्वेलर्सच्या जागेवर छापा टाकला होता. या प्रकरणी ईडी आता प्रकाश राज यांची चौकशी करणार आहे. प्रकाश राज प्रणव ज्वेलर्ससाठी जाहिरात करतात.

प्रकाश राज यांनी अनेकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शाब्दिक हल्ला केला आहे. यावेळी ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता या कारणास्तव तर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही ना....असे प्रश्न त्यांच्या चाहत्यांनी उपस्थित केले आहे.

ईडीला अनेक महत्त्वाची कागदपत्रे -

तामिळनाडूच्या त्रिची येथील प्रसिद्ध प्रणव ज्वेलर्समध्ये पीएमएलए अंतर्गत शोध मोहिमेदरम्यान अशी अनेक कागदपत्रे सापडली. ज्यामध्ये सुमारे 23 लाख 70 हजार रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळाली. एवढेच नाही तर ईडीने झडतीदरम्यान 11 किलो 60 ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त केले होते.

सुवर्ण योजनेतून 100 कोटी रुपये जमा -

प्रणव ज्वेलर्सच्या लोकांनी अनेक शेल कंपन्यांच्या माध्यमातून सोने योजनेतून जनतेकडून गोळा केलेले 100 कोटी रुपये गुंतवल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले. ईडीच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान असे आढळून आले की प्रणव ज्वेलर्स आणि त्याच्याशी संबंधित लोकांनी फसवणूक करून घेतलेले पैसे दुसऱ्या शेल कंपनीकडे वळवले होते.

प्रकाश राज त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत-

अभिनेते प्रकाश राज त्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे आणि चांद्रयान 3 च्या आधीच्या विधानांमुळे वादात सापडले होते, ते प्रणव ज्वेलर्सचे ब्रँड अॅम्बेसेडर होते. या ज्वेलर्स कंपनीच्या जाहिरातीचा ते चेहरा ठरले आहेत. मात्र प्रणव ज्वेलर्सचे कृत्य उघड होताच त्यांनी मौन पाळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मध्ये कोट्यवधींचा घोटाळा, RTIकडून खुलासा, ट्विट करत काँग्रेस नेत्याचे महायुतीवर टीकास्त्र

Shri Thanedar: ट्रम्प लाट असूनही मराठमोळ्या नेत्याने उधळला विजयाचा गुलाल! दुसऱ्यांदा बनले अमेरिकेचे खासदार, कोण आहेत श्री ठाणेदार ?

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

USA Election 2024: राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! सोशल मीडियावर मिम्सचाही पाऊस

Latest Marathi News Updates live: महाविकास आघाडीच्या सभेत जयस्तुते गाण्याच सादरीकरण

SCROLL FOR NEXT