Eros Theatre Memory Esakal
मनोरंजन

Eros Theatre: 'मुंबईला आपला वारसा जपताच आला नाही..', सोशल मीडियावर इरॉस थिएटरच्या आठवणींना आला पूर..

प्रणाली मोरे

Eros Theatre: मुंबईतल्या सिंगल स्क्रीन थिएटरमधलं लक्झुरियस थिएटर म्हणून इरॉसची ओळख. चर्चेगेटमध्ये उच्चभ्रू वस्तीत वसलेल्या या थिएटरचा आपलाच असा एक थाट होता. या सिंगल स्क्रीन थिएटरनं अनेक बड्या सिनेमांचे प्रीमियर सोहळे अनुभवले आहेत.. नव्हे तो साक्षीदार आहे अनेक सुपरहिट-ब्लॉकबस्टर सिनेमांचा.

अनेक बड्या कलाकारांचे करिअर त्यानं घडताना पाहिलंय. मल्टिप्लेक्सचं वादळ आलं आणि त्यापुढे अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सनी मान टाकली. यात प्रामुख्याने चंदन सिनेमा,इम्पेरिअल सिनेमा,रॉयल सिनेमा नॉवेल्टी सिनेमा,ताज टॉकीज यांची नावं घेता येतील. इरॉस हे एकमेव थिएटर होते ज्यानं शेवटपर्यंत लढा दिला..पण अखेर २०१७ मध्ये त्याला हात पत्करावी लागली या मल्टिप्लेक्सच्या साम्राज्यापुढे.

आता जिथं इरॉस थिएटरची इमारत दिमाखात उभी होती तिचं रुपांतर आता मॉलमध्ये करण्यात येणार आहे.(Eros Theatre: Fans share their fond memories of watching their favourite movies in the iconic theatre)

एका सिनेप्रेमीनं इरॉसच्या इमारतीचा फोटो शेअर करत एक हार्टब्रेकिंग पोस्ट केली आहे. अपूर्व नावाच्या नेटकऱ्यानं इरॉसच्या इमारतीचं सुरु असलेलं काम दाखवलं आहे त्या फोटोच्या माध्यमातून. त्यानं लिहिलं आहे,''हार्टब्रेकिंग..इरॉस थिएटर आता कालबाह्य झालं. दक्षिण मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत हे थिएटर १९३८ साली उभारलं होतं. मला आठवतंय मी कॉलेज बुडवून इरॉसमध्ये सिनेमे पाहिले आहेत. हे तेच थिएटर आहे जो माझ्या फर्स्ट रोमॅंंटिक डेटचा साक्षीदार आहे आणि जिथे मी त्यावेळी १९९८ साली 'सत्या' सिनेमा पाहिला होता. मला वाईट वाटतंय मुंबईला आपला वारसा जपता आला नाही याचं''.

या नेटकऱ्याच्या ट्वीटवर रिअॅक्ट होत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील आपल्या सिंगल स्क्रीन थिएटरच्या आठवणी शेअर केल्या आहेत. ते म्हणाले आहेत,''अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद पडले.आणि सोबत माझ्या बालपणीच्या आठवणींचा देखील त्यात अंत झाला. मी दिग्दर्शित केलेले ४ सिनेमे इथे रिलीज झाले आहेत. शेकडो सिनेमे इथे मी पाहिलेयत,जास्तकरुन जागतिक सिनेमा पाहण्यासाठी मी इथल्या मॅटनी शोजना आवर्जुन जायचो. तो एक अद्भूत काळ होता..पण आता वास्तवात ते सगळं हरवलं आहे याची जाणीव त्रास नक्कीच देते''.

इरॉस हे मुंबईतील एकमेव सिंगल स्क्रीन थिएटर होतं ज्यांची बांधणी खूपच आकर्षक होती. हे थिएटर काम्बाता फॅमिलीनं बांधलं होतं,ज्यांची स्वतःची विमान कंपनी देखील होती. २०१७ मध्ये इरॉसला सील करण्यात आलं ते अनेक वादग्रस्त केसेसमुळे. १२०४ लोकांची बसायची क्षमता या थिएटरची होती. शोरबाजी भेद्वार यांनी हे थिएटर डिझाइन केलं होतं ते १९३८ साली. मुंबईतील लक्झुरियस थिएटरपैकी एक अशी ख्याती इरॉसची होती. आता हे सगळं आठवणीत उरलं आहे..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT