Falguni Pathak angry on neha kakkar,to remix of maine payal hai chhankai song  Google
मनोरंजन

'माझ्या हातात असतं तर मी हिला...', नेहा कक्करवर भडकली फाल्गुनी पाठक, वाचा प्रकरण...

नेहानं ९० च्या दशकातील फाल्गुनी पाठकच्या 'मैने पायल है छनकाई' या गाण्याचं केलेलं रीमिक्स गरबा क्वीनसोबतच तिच्या चाहत्यांनाही जोरदार खटकलं आहे.

प्रणाली मोरे

Falguni Pathak Angry On Neha Kakkar: नेहा कक्करने म्युझिक इंडस्ट्रीत आपली अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती आपल्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेतही असलेली पहायला मिळते. नेहाला रीमिक्स क्वीनही म्हणतात. तिनं आजपर्यंत जेवढी गाणी रीमिक्स करुन गायली आहेत ती बऱ्यापैकी सगळीच सुरपहिट ठरली आहेत. आता तिनं ९०च्या दशकातलं 'मैने पायल है छनकाई..' या गाजलेल्या गाण्याचं रीमिक्स गाणं नुकतंच रिलीज केलं आहे.

फाल्गुनी पाठक देशातील त्या प्रतिष्ठित गायकांपैकी एक आहे, जिनं आपल्या मधुर आवाजानं चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच नवरात्री निमित्तानं फाल्गुनी पाठकनं आपलं नवं गाणं रिलीज केलं होतं,आणि उत्सवाआधीच तिनं वातावरण नवरंगात रंगून टाकलं आहे. फाल्गुनीआपल्या या नवीन गाण्यासंदर्भात खूपच उत्साहित होती खरंतर, पण तिच्या जुन्या गाजलेल्या 'मैने पायल है छनकाई...', गाण्याचं नेहानं रिमिक्स केलं आणि फाल्गुनी नेहावर बरसली.

नेहानं केलेल्या या रिमिक्समध्ये प्रियांक शर्मा,धनश्री वर्मा आणि नेहा स्वतः देखील आहे. नेहा कक्करनं केलेल्या या रिमिक्सवर आता नेटकऱ्यांसोबतच फाल्गुनीनं देखील निशाणा साधला आहे. गरबा क्वीन फाल्गुनीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून या रीमिक्सवर आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

फाल्गुनी पाठकनं इन्स्टाग्रामवर या रीमिक्स विषयी प्रतिक्रिया देताना सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी रीमिक्स विरोधात दिलेल्या प्रतिक्रियांचा एक स्क्रीनशॉट आपल्या स्टोरीत शेअर करत नेहावर थेट निशाणा साधला आहे. फाल्गुनीनं शेअर केलेल्या या स्टोरीवर एका नेटकऱ्यानं नेहाची शाळा घेत लिहिलं होतं की,'पहिल्यापासून ज्या कलाकृती हिट ठरल्यात त्यांचाच उपयोग करुन पैसे कमावण्यापेक्षा नेहानं आपलं डोकं,आपल्या अंगातील कलागुणाचा वापर करुन काहीतरी नवीन करायला हवं होतं'. तर फाल्गुनीनं नेहाविरोधात जी दुसरी इन्स्टास्टोरी शेअर केली आहे त्यावर एकानं लिहिलं आहे,''आमच्या लहानपणीच्या आठवणी हिनं धुळीला मिळवून टाकल्या''. फाल्गुनीच्या तिसऱ्या इन्स्टा स्टोरीवर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'असली पापं करणं बंद करा. कृपया कोणी तरी नेहाच्या गाण्यांवर बंदी आणा'.

नेहानं फाल्गुनीच्या 'मैने पायल है छनकाई..' गाण्याचं रिमेक केल्यानं गरबा क्वीनचा चाहता वर्ग नेहावर भलताच भडकला आहे. या गाण्यातील तिच्या आवाजावर सडकून टिका केली जातेय. आणि नेहाला ९० च्या दशकातील या हिट गाण्याची वाट लावली म्हणत खूप ट्रोल केलं जात आहे. यादरम्यान सोशल मीडियावर फाल्गुनी पाठकला बऱ्याच नेटकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर 'आय स्टॅंड विथ यू फाल्गुनी' असा ट्रेंड सुरु झाला आहे. फाल्गुनी यावर असं देखील म्हणाल्याचं समोर येत आहे की,''या गाण्याचे लीगल राइट्स माझ्याकडे नाहीत त्यामुळे मी नेहावर केस करु शकत नाही,पण तिच्या या गाण्यामुळे मात्र मी खूप नाराज आहे तिच्यावर''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT