fans arrange grand tractor march rally in pune to support tdm marathi movie bhaurao karhade sakal
मनोरंजन

TDM चा नाद नाय! थिएटर मिळालं नाही म्हणून चाहत्यांनी पुण्यात थेट ट्रॅक्टर मोर्चा काढला..

'टीडीएम'ला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात भव्य ट्रॅक्टर मोर्चा..

नीलेश अडसूळ

TDM movie latest update: fans arrange grand tractor march rally in pune to support tdm marathi movie bhaurao karhade

ख्वाडा, बबन यासारऱ्या अस्सल गावरान ढंगातील, रंगातील चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत आपली वेगळी ओळख निर्माण कऱणारा दिग्दर्शक म्हणून भाऊ कऱ्हाडेचे नाव घ्यावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून भाऊ आणि त्याचा टीडीएम नावाचा चित्रपट चर्चेत आहे.

टीडीएमचा ट्रेलर व्हायरल झाला आणि प्रेक्षकांना त्या चित्रपटाचे वेध लागले होते. २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या टीडीएमला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यानंतर या चित्रपटाला थिएटरमध्ये पुरेशा प्रमाणात स्क्रिन न मिळाल्यानं नाईलाजानं चित्रपटाचं प्रदर्शन थांबवावं लागलं.

यामुळे प्रेक्षकांची मोठी निराशा झालीच शिवाय याबाबत बोलताना दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे भावुक झाले. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच पेटलं आहे. पुण्यात या चित्रपटाच्या समर्थनार्थ चक्क भव्य मोर्चा काढला आहे, तेही ट्रॅक्टरवरुन..

(fans arrange grand tractor march rally in pune to support tdm marathi movie bhaurao karhade)

एखादा चित्रपट चालावा म्हणून अशा पद्धतीचा मोर्चा काढणं ही ऐतिहासिक कृती म्हणावी लागेल. या चित्रपटाला शो मिळावे यासाठी शिरूर मधील नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून ट्रॅक्टर रॅली काढली. एखादया चित्रपट दिग्दर्शक व चित्रपट समर्थनासाठी ग्रामीण भागातील नागरीक एकवटल्याने या घटनेची आता चांगलीच चर्चा होत आहे.


'टीडीएम' चित्रपट पुण्यात दणक्यात प्रदर्शित झाला. त्यांच्या आजवरच्या चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी तितकंच उचलून धरलं पण चारच दिवसांत अनेक मोठ्या चित्रपटगृहांमधून हा चित्रपट काढून टाकण्यात आला. तर अनेक चित्रपटगृहांनी या चित्रपटाला प्राईम टाईम नाकारला. यामुळे अक्षरशः भाऊराव प्रेक्षकांसमोर हात जोडून रडले आणि त्यांनी चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला.

पण शिरूरकरांनी मात्र भाऊरावांची साथ द्यायचं ठरवलं आणि ते 'TDM'च्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. यावेळी शिरूर येथील बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा : Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या मोर्चा मध्ये हजारो नागरिक सामील झाले होते. मोठ्या प्रमाणात एका चित्रपटासाठी दाखवण्यात आलेले हे राज्यातील पाहिजेच शक्तिप्रदर्शन असेल. ज्याची दखल सर्वांनी घेतली. या मोर्चात 'भाऊराव तुम्ही खचु नका आम्ही तुमच्या सोबत आहोत..' असा नारा देण्यात आला.

'ग्रामीण भागातील एक तरुण चित्रपटसृष्टीत नवे काही करु पाहत आहे. आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी भक्कम पणे उभे आहोत,' अशा भावना यावेळी शिरुरकरांनी व्यक्त केली.

भाऊराव कऱ्हाडे हे शिरुर परिसरातील गव्हाणेवाडी येथील आहेत. अत्यंत वेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार करून त्यांनी संबंध भारताचे लक्ष वेधले. त्यांच्या 'ख्वाडा' या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर 'बबन' हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर दणदणीत कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

शेतकरी, रिक्षाचालक, वीटभट्टी मजुर ते चित्रपटसाठी शेत जमीन विकणारा ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता असा भाऊरावांचा खतदार प्रवास आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT