farhan akhtar toofan  file image
मनोरंजन

Toofan Review; 'तुफान' एक छोटीशी वावटळ!

फरहान अख्तर, परेश रावल आणि मोहन आगाशे यांनी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

महेश बर्दापूरकर

फरहान अख्तर (farhan akhtar) आणि राकेश ओमप्रकाश मेहरा (Rakeysh Omprakash Mehra) या कलाकार-दिग्दर्शक जोडीनं ‘भाग मिल्खा भाग’ हा नितांतसुंदर चित्रपट दिला होता आणि म्हणूनच त्यांच्या ‘तुफान’ (Toofan) या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. प्रोमोजनं त्या आणखी वाढवल्या होत्या. मात्र, पाच-पंचवीस चित्रपटांच्या कथा एकत्र करून तयार झालेलं कथानक, अनेक रटाळ उपकथानकं, मोठी लांबी, संकलनातील चुका, अनेक फॉर्म एकत्र करीत तयार केलेलं कर्णकटू संगीत यांमुळं हा चित्रपट एक छोटी वावटळ ठरतो. फरहान अख्तरनं भूमिकेसाठी घेतलेले कष्ट आणि परेश रावल, मोहन आगाशे यांचा सुखावणारा अभिनय या त्यातल्या त्यात जमेच्या बाजू.

‘तुफान’ची गोष्ट काल्पनिक आहे. मुंबईतील डोंगरी भागातला अज्जू भाई (फरहान अख्तर) हा परिसरातील गुंड आहे, मात्र तो चुकून बॉक्सिंगच्या रिंगमध्ये येऊन पोचतो. त्याला नाना प्रभू (परेश रावल) हे प्रशिक्षक मिळतात आणि त्याचं बॉक्सिंगमधील करिअर बहरू लागतं. नानांची मुलगी अनन्या (मृणाल ठाकूर) अज्जूच्या प्रेमात पडते आणि त्याला बॉक्सिंगमध्ये नाव मिळवण्यासाठी प्रेरणा देते. (अर्थात, नानांना आपली मुलगी एक मुस्लिम युवकाच्या, आपल्याच शिष्याच्या प्रेमात पडली आहे, हे माहीत नसतं. समजल्यावर हिंदू-मुस्लिम संघर्ष पेटतो...त्याला ‘लव्ह जिहाद’चं नाव दिलं जातं...वगैरे वगैरे.) दोघं लग्नही करतात, मात्र संसार नीट चालवण्याच्या प्रयत्नात अज्जू बॉक्सिंगच्या सामन्यात एक चूक करून बसतो...आता त्याच्या करिअरचं काय होतं, त्याला पुन्हा बॉक्सिंग रिंगमध्ये उतरता येतं का, अनन्याचं काय होतं या प्रश्‍नांची रटाळ आणि तेवढीच लांबलचक उत्तरं चित्रपटाचा शेवट देतो.

चित्रपटाच्या कथेत अनेक चढ-उतार आहेत, मात्र ते खूपच तकलादू आणि न भिडणारे आहेत. अज्जू आणि नानांमधील संघर्ष टोकदार आहे, मात्र तो हिंदू-मुस्लिम या बोथट पायावर उभा असल्यानं बिलकूल रंगत नाही. अज्जू आणि अनन्यामधील प्रेमाचं प्रसंगही असेच ओढून-ताणून आणल्यासारखे झाले आहेत. अज्जूच्या रिंगमधील चुकीमुळं कथेत ट्विस्ट येतो, पण इथं प्रेक्षकांची सहानुभूती नायकाच्या बाजूनं राहात नाही आणि कथा आणखी रटाळ होते. (काल्पनिकच ट्विस्ट होता, तर तो वेगळा आणि पटण्यासारखा द्यायला हरकत नव्हती.) या पायावर उभा केलेला शेवट न पटणारा झाल्यास नवल नाही. चित्रपटातील रॅपपासून सुफीपर्यंतच्या अनेक फॉर्ममधील गाणी अजिबात लक्षात राहात नाहीत. बॉक्सिंगच्या रिंगमधील चित्रीकरण जोरदार असलं, तर त्याचाही प्रभाव जाणवत नाही.

अभिनयाच्या आघाडीवर फरहान अख्तरनं घेतलेले कष्ट दिसतात, मात्र त्याला कथेची साथ न मिळाल्यानं कुचकामी ठरतात. टपोरी गुंड, बॉक्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी पेटून उठलेले युवक व पुनरागमन करण्यासाठी झगडणारा अज्जू साकारताना त्यानं देहबोलीत केलेले बदल जबरदस्त. मृणाल ठाकूरच्या वाट्याला मोठी भूमिका आली आहे, प्रेम प्रसंगांमध्ये तिचा प्रभावही पडतो. मात्र, एकुणात तिची भूमिका लक्षात राहात नाही. परेश रावल यांनी साकारलेला कट्टर हिंदू प्रशिक्षक सर्वाधिक भाव खाऊन जातो. त्याच्या वाट्याला आलेले संवादही टाळ्या मिळवतात. नानांच्या मित्राच्या भूमिकेत मोहन आगाशेंनी छान साथ दिली आहे. इतर कलाकारांनी फारशी संधी नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT