Gautami Patil: गौतमी पाटील हा विषय दिवसेंदिवस जास्तच गंभीर होत चालला आहे. सर्व मीडियाचे लक्ष तिच्यावर लागले आहे. या आधी तिच्या नाचावर, तिच्या हावभावावर बरीच चर्चा झाली, वाद झाले आता मात्र जरा गाडी भलत्याच ट्रॅक वर केली आहे.
सध्या गौतमी चर्चेत आहे ते तिच्या लग्नाच्या बातमी मुळे. नुकतीच तिने एक मुलाखत दिली ज्यामध्ये ती तिला आयुष्यात कसा जोडीदार हवा, तिला लग्न करायचंय का नाही आणि तिच्या अटी काय यावर ती भरभरून बोलली.
पण तिच्या या लग्न करण्याच्या इच्छेवरच एकाने आक्षेप घेलता आहे. महाराष्ट्रातील बीड येथील शेतकऱ्याने चक्क गौतमीला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने गौतमीवर टीका देखील केली आहे. हे पत्र सध्या चर्चेचा विषय झाले आहे.
(farmers son letter to gautami patil viral video post lavani dance)
श्रीकांत गडळे असे शेतकरी कुटुंबातील तरुणाचे नाव असून या पत्रात तो म्हणाला आहे की, ''गौतमी पाटीलचे हाल बेहाल, तुमचे चाहते लाखो पण.. लग्नाला तयार कोणीच नाही. आमच्या महाराष्ट्रात मुलगी लग्नाला आली कि मुलाच्या घरचे मुलींच्या घराचे उंबरठे झिजवतात. तरी मुलाला मुलगी मिळत नाही आणि मुलीला लग्न कर म्हणायची वेळ येत नाही. गौतमी पाटील तुमचे लाखो चाहते पण.. लग्नाला कोणीच तयार नाही.''
''तुमचे ठुमके वर लाखो फिदा पण लग्नाला कुणीच तयार नाही जरा आत्म परीक्षण करा. या महाराष्ट्रात चातक मटक भाजी एकवेळ गॉड लागते पण पोट व मन भरायला चटणी भाकरी भाजी ठेसाच लागतो. हा कृषिप्रधान देश आहे तुमच्या डान्सचे ठुमके कमी करा गौतमी पाटील तुम्ही आत्म परीक्षण करा.''
पुढे तो म्हणतो, ''खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री अयोध्येला निघालेत, महाराष्ट्रात विजेचा कडकडाट आणि अवकाळी पावसाने पिके गेली मुकी जनावरे गेली. तरी काही तरुण वर्ग तुमच्याच नादात असला आणि लाखो चाहते असले तरी एकही लग्नाला तयार नाही. किसान पुत्र श्रीकांत गडळे सांगतो … इतर शेतकरी पुत्र उपाशी राहतील कापसाला पाणी बकेटने मारतील पण लग्नाला कोणीच तयार होणार नाही. आत्मपरीक्षण करा..” असे त्याने पत्रात म्हंटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.