Rohit Bal Health Update: Esakal
मनोरंजन

Rohit Bal: रोहित बालची तब्येत आता कशी? काही दिवसांपुर्वी व्हेंटिलेटरवर होता फॅशन डिझायनर!

रोहित बालचा पोस्ट व्हायरल!

Vaishali Patil

Rohit Bal Health Update: प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बालची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खुपच खराब होती. तो मृत्यूशी झुंज देत होता. रोहित गेल्या अनेक दिवसांपासून गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल होता. त्यामुळे चाहते त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करत होते. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.

आता रोहितच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तो आयसीयूमधून बाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

आता रोहितनेही आपल्या चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर करत हेल्थ बाबत अपडेट दिले आहे. त्यासोबत त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहे.

रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. यात रोहित लिहितो, "माझ्या आजारपणात तुम्ही मला दिलेलं प्रेम आणि प्रार्थना माझ्या मनापर्यंत भिडल्या आहेत. तुम्ही दिलेला पाठिंबा माझ्यासाठी आशा आणि शक्तीचे प्रतीक आहे.., त्या मला माझ्या या प्रवासात मदत करत आहे. या आव्हानात्मक काळात माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. ...आशा आणि धैर्याने पुढे जात राहूया.."

आता रोहितची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी त्याच्या पोस्टवर कमेंट करत आहेत. यासोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही रोहितच्या पोस्टवर कमेंट करून आनंद व्यक्त करत आहेत

2010 मध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रोहितची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. गेल्या महिन्यात त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रोहितने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. रोहितने अमिताभ बच्चन, काजोल, ईशा गुप्ता, कंगना राणौत, पूजा हेगडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींसाठी कपडे डिझाइन केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT