18 डिसेंबर हा दिवस जगभरात ऐतिहासिक दिवस ठरला. केवळ फुटबॉल क्षेत्रातच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील लोकांना याची उत्सुकता होती. FIFA विश्वचषक 2022 मध्ये अर्जेंटिनाने ट्रॉफी जिंकून इतिहास तर रचला मात्र त्यात भारतीचीही चर्चा होती. भारतही यात मागे नव्हता.
अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही काल ऐतिहासिक कामगिरी केली. दीपिका पदुकोणने FIFA विश्वचषक ट्रॉफी लॉन्च केली. असं करणारी ती पहिली जागतिक स्टार बनली आहे. भारतासाठी हा फार अभिमानाचा क्षण होता.
माजी स्पॅनिश गोलकीपर इकर कॅसिलासने दीपिका पदुकोणसह फिफा विश्वचषक ट्रॉफी लॉन्च केली. दीपिका पदुकोण ही तर एक अभिनेत्री आहे. तिने एका व्हॉलिवूडच्या चित्रपटातही काम केलंय. तिचा फुटबॉलशी दुरदुर पर्यत्न काहीही संबंध नाही. अशा स्थितीत प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की ट्रॉफी लॉन्च करण्यासाठी दीपिकाची निवड का करण्यात आली?
सोशल मीडियावरही लोक हाच प्रश्न विचारत आहेत. लुसेल स्टेडियमवर दीपिका पदुकोण आणि इकर कॅसिलास यांनी फिफा विश्वचषक ट्रॉफीचे लाँचिंग केले. Iker Casillas FIFA विश्वचषक ट्रॉफी हातात घेत आहे. तिने ही ट्रॉफी लॉन्च केली. सर्व जग त्याच साक्षी झालं हा खुप अभिमानाचा क्षण होता.
आता फिफा ट्रॉफी लॉन्च करण्यासाठी दीपिकाचीच निवड का करण्यात आली याच उत्तर:
FIFA विश्वचषक ट्रॉफी लॉन्च करण्यासाठी दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली कारण ह्या ट्रॉफीची केस ग्लोबल लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनने (Louis Vuitton) डिझाइन केलेली आणि बनवली आहे. दीपिका या लक्झरी ब्रँडची अॅम्बेसेडर आहे. याशिवाय दीपिका अनेक आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्सचा ग्लोबल चेहरा देखील आहे.
टाईम मॅगझिनमध्येही दीपिकाचे नाव दोनदा आले होते. त्याच वेळी, दीपिका पदुकोणने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील आपले आकर्षण दाखवले आहे आणि ती ज्युरी सदस्य देखील होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.