Fighter Movie News: हृतिक रोशनच्या 'फायटर' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. हृतिक या सिनेमात वायुसेनेच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हृतिकसोबतच या सिनेमात अनिल कपूर - दीपिका पादुकोण सुद्धा प्रमुख भूमिकेत आहेत.
सध्या 'फायटर'ची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच वचन दिल्याप्रमाणे 'फायटर'च्या टीमने सर्वांना #थँक्यूफायटर अशी पत्रं सुपूर्द केली!
भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या अभूतपूर्व साहसाला आणि शौर्याला सलाम करण्याकरता, या चित्रपटाच्या टीमने #थँक्यूफायटर ही मोहीम सुरू केली. या मोहिमेद्वारे नागरिकांना देशाच्या हवाई योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक विशेष संधी प्राप्त झाली. आश्वासन दिल्यानुसार, चित्रपटातील प्रमुख कलाकार हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांनी पुण्याच्या हवाई दलाच्या तळाला भेट दिली. याशिवाय नागरिकांनी व्यक्तिगतरीत्या लिहीलेली #थँक्यूफायटर पत्रे सिनेमाच्या टिमने भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द केली.
#थँक्यूफायटर मोहिमेद्वारे देशव्यापी पत्रे गोळा करून, आपल्या देशाच्या शूर राष्ट्रवीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आणि भारतीय हवाई दलाच्या चैतन्याचा आणि शौर्याचा सन्मान व्यक्त करत हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांनी त्यांचे वचन पूर्ण केले. आणि पुण्याच्या हवाई दलाच्या तळावरील हवाई योद्ध्यांसोबत कृतज्ञतेचा हा क्षण साजरा केला.
#थँक्यूफायटर उपक्रमाला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या मोहिमेअंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यातून २ लाख ५० हजार हस्तलिखित पत्रे आणि १० लाख ऑनलाइन पत्रे जमा झाली.
आपल्या देशाच्या संरक्षणाकरता हौतात्म्य पत्करलेल्या अनाम भारतीय हवाई योद्ध्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहण्याची ही सुवर्ण संधी नागरिकांना उपलब्ध झाली होती. या मोहिमेअंतर्गत हवाई योद्ध्यांप्रती नागरिकांनी हृद्य आभार संदेश व्यक्त केले आहेत.
आपल्या देशाच्या हवाई दलातील योद्धांना श्रद्धांजली वाहण्यास आणि कृतज्ञता प्रकट करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या या मोहिमेला देशभरातून मोठा प्रतिसाद लाभला.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि ‘मार्फ्लिक्स पिक्चर्स’च्या सहकार्याने ‘वायाकॉम१८ स्टुडिओ’द्वारे प्रस्तुत, ‘फायटर’ या सिनेमात सिनेरसिकांना उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हृदयस्पर्शी साहसी कथा आणि उत्फुल्ल देशभक्ती यांचा गोफ विणणारा हा चित्रपट एक अतुलनीय सिनेमॅटिक अनुभव देतो.
२५ जानेवारी २०२४ रोजी 'फायटर' हा चित्रपट चित्रपटगृहांत दाखल होत असून, हा भव्य अनुभव घेण्याकरता सज्ज राहा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.