Fighter Trailer Review Hrithik Roshan Deepika Padukone  esakal
मनोरंजन

Hrithik Fighter Trailer Review : विशेष काही नाही, तेच ते... देशभक्तीच्या नावाखाली लोकांना वेडं करण्याचा प्रयत्न

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशनचा वेगळा अंदाज असलेला फायटर हा याच महिन्यात येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

युगंधर ताजणे

Fighter Trailer Review Hrithik Roshan Deepika Padukone : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशनचा वेगळा अंदाज असलेला फायटर हा याच महिन्यात येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांच्या उड्या पडताना दिसत आहे. मात्र तो ट्रेलर पाहिल्यावर पुन्हा एकदा त्याच त्या विषयांवरील चित्रपटांची मालिका सुरु झाल्याचे दिसून आले आहे.

गेल्या वर्षी शाहरुखचा पठाण, टायगर अन् ऋतिकचा वॉर, सनी देओलचा गदर, विकी कौशलचा सॅम बहादूर, सलमानचा टायगर ३, कंगनाचा तेजस या चित्रपटांची वानगी दाखल नावं सांगता येतील. या चित्रपटांमधील बहुतांशी विषय हा पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या भारताविरोधातील आतंकवादी कारवाया हा होता. त्यात भारतीय गुप्तहेर, त्यांच्या साहसकथा, त्याचे मिशन आणि त्यांचा संघर्ष हे बॉक्स ऑफिसवर कमाईचा सक्सेस पासवर्ड होता.

ऋतिक आणि दीपिकाचा आता फायटर नावाचा चित्रपटही पुन्हा पुलवामा अटॅक, त्यानंतरचा संघर्ष आणि भारतीय वैमानिकांची कामगिरी यावर प्रकाशझोत टाकताना दिसतो. हे विषय यापूर्वीच्या चित्रपटांमध्ये येऊन गेले आहेत. विकी कौशलचा उरी आल्यानंतर भारत-पाकिस्तान विषयावर आलेल्या चित्रपटानं त्या मुद्याचे गांभीर्य कमी केल्याचे दिसून आले आहे. प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यासाठी बऱ्याचदा देशभक्तीपर विषयांवरील चित्रपटांचा उपयोग करुन घेतला जातो. असे चित्र दिसून आले आहे.

काय आहे फायटर?

प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या फायटरची निर्मिती व्हायकॉम १८ स्टुडिओज आणि मारफ्लिक्स पिक्चर्सच्यावतीनं करण्यात आली आहे. नेटकऱ्यांनी फायटरचा ट्रेलर व्हायरल झाल्यानंतर अल्पावधीतच त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्याच्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र दुसरीकडे काही जणांनी त्याला वेगळ्या अर्थानं ट्रोलही करण्यास सुरुवात केली आहे.

पुलवामा अॅटक झाल्यानंतर भारतीय वायुदलानं घेतलेली भूमिका, त्यानंतर भारत-पाकिस्तान संघर्ष यावर दिग्दर्शकानं वेगळ्या प्रकारे भाष्य करण्याचा प्रयत्न या फायटरमधून केल्याचे दिसून येत आहे. खरं तर गेल्या वर्षी देशभक्तीपर चित्रपटांची मालिका समोर आली होती. त्यात ऋतिक आणि टायगरचा वॉर, शाहरुखचा पठाण आणि सनी देओलचा गदर यांची प्रामुख्यानं नावं घ्यावी लागतील.

त्यापैकी शाहरुखचा पठाणनं हजार कोटींची कमाई केली होती. त्यातील संवादही हिट झाले होते. शाहरुखचा बऱ्याच दिवसानंतर आलेला चित्रपट, त्याचा हटके लूक आणि शाहरुखचा मोठा फॅन बेस यामुळे पठाणला प्रेक्षकांची पसंती मिळाल्याचे दिसून आले. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दीपिकाच्या बिकीनीवरुन झालेला वादही चित्रपटासाठी लाभदायी ठरला होता.

सनी देओलच्या गदरनं देशभरात वेगळेच वातावरण असल्याचा परिचय करुन दिला होता. त्यानं देखील हजार कोटींची कमाई करुन वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता. या सगळ्यात सनी देओलच्या २२ वर्षानंतर आलेल्या गदरमध्ये पुन्हा एकदा तारा सिंग देशभक्ताच्या रुपानं समोर आला होता. त्याचा अभिनय आणि तो अभिनिवेश वगळता बाकी सगळं नावालाच होते. अशी परिस्थिती होती.

ऋतिक, दीपिका आणि अनिल कपूरचा फायटर हा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यात करण सिंग ग्रोव्हर, संजीदा शेख यांच्याही भूमिका आहेत. दीपिका आणि ऋतिक हे पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेयर करत असल्यानं त्यांच्या या चित्रपटाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT