Film producer Kamal Kishore Mishra arrested for trying to run over wife with car  sakal
मनोरंजन

Kamal Kishor Mishra: पत्नीला कारने चिरडल्या प्रकरणी अखेर निर्मात्याला अटक! पत्नी म्हणते..

प्रसिद्ध निर्मात्यावर मुंबई पोलिसांची कारवाई..

नीलेश अडसूळ

Kamal Kishor Mishra:  फिल्म प्रोड्युसर कमल मिश्रा याने आपल्याच बायकोला कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना काल गुरुवार 27 ऑक्टोबर रोजी समोर आली. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून मुंबईतील अंबोली परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार काल गुन्हा दाखल केला होता. कमल किशोर मिश्रा असं या दिग्दर्शकाच नाव असून पोलिसांनी त्याला अटक केल्याची मोठी अपडेट समोर आली आहे.

(Film producer Kamal Kishore Mishra arrested for trying to run over wife with car)

'भूतियापा', 'देहाती डिस्को' सारखे चित्रपट निर्माण करणारे निर्माता कमल किशोर मिश्रा यांनी हे माणुसकीला काळीमा लावणारे कृत्य केले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कमल किशोर मिश्रा फरार झाले होते. मात्र मुंबई पोलिसांनी शोध घेत अखेर त्यांना अटक केली आहे. गुरुवारी रात्रीच त्यांना अटक करण्यात आली. पोलीस आज कमलकि शोर मिश्रा यांना मुंबईतील अंधेरी न्यायालयात हजर करणार आहेत.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला. कमल यांना त्यांच्या पत्नीने दुसऱ्या महिलेसोबत पकडलं होतं. त्यानंतर हा प्रकार घडला. पोलिसांनी बुधवारी सांगितले की, घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कमलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये कमलची पत्नी जमिनीवर पडताना दिसत होती. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी पश्चिम अंधेरीतील एका निवासी इमारतीच्या पार्किंग परिसरात घडली होती.

व्हिडिओ मध्ये दिसले होते की, पार्किंग एरियामध्ये एक महिला कार चालकाला थांबवते. पण तो थांबत नाही आणि तिला कारसमोर धडक देतो. ती महिला पडते आणि नंतर कारची पुढची चाकं तो तिच्या पायावर चालवतो. त्यानंतर एक व्यक्ती धावत येऊन महिलेला कारखालून बाहेर काढतो.

पत्नीला कारने धडक दिल्याप्रकरणी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात आएपीसी कलम 289 आणि 338 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर आपल्या डोक्याला जबर दुखापत झाल्याचं त्यांच्या पत्नीचं म्हणणं आहे. दरम्यान चित्रपट निर्माता कमल अद्याप फरार होता. त्याचा शोध सुरु असून याप्रकरणी तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. त्यानुसार काल रात्री मुंबई पोलिसांनी कमल किशोर मिश्रा यांना ताब्यात घेतलं आहे.

कमल यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले आहे की, 'जेव्हा मी कमल यांच्या घरी गेले. तेव्हा ते आपल्या कारमध्ये एका दुसऱ्या महिलेसोबत बसले होते. ते त्या महिलेसोबत रोमँटिक होत होते. हे सर्व पाहून मी कारच्या खिडकीची काच ठोठावली. त्यांना खिडकी उघडण्यास सांगितलं. मला त्यांच्याशी बोलायचं असल्याचंही सांगितलं. परंतु त्यांनी माझं काहीच नाही ऐकलं. आणि ते कार चालू करुन पळ काढू लागले. यादरम्यान मी गाडी खाली आले. त्यांनी मलाच चिरडलं. या घटनेदरम्यान माझ्या डोक्याला आणि पायाला जरब दुखापत झाली आहे'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT