Filmmaker Alphonse Puthren alleges that Vijayakanth was murdered 
मनोरंजन

Alphonse Puthren: साउथस्टार विजयकांतची हत्या तर पुढचा नंबर स्टॅलिनचा! दिग्दर्शकाचा खळबळजनक दावा!

विजयकांत यांचे निधन नव्हे तर हत्या करण्यात आली आहे असा दावा केला जात आहे.

Vaishali Patil

साऊथ सुपरस्टार आणि DMDK चे प्रमुख कॅप्टन विजयकांत यांचे गुरुवारी निधन झाले. चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजयकांत यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला.

सोशल मिडियावर चाहते शोक व्यक्त करत पोस्ट शेयर करत आहे. तर दुसरीकडे विजयकांत यांचे निधन नव्हे तर हत्या करण्यात आली आहे असा दावा केला जात आहे.

मल्याळम दिग्दर्शक अल्फोन्स पुथरेनने विजयकांत यांच्याबद्दल हा दावा केला आहे. यामुळे विजयकांत यांच्या चाहत्यांना आश्चर्यचा धक्का बसला आहे.

अल्फोन्स पुथरेनने एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यात विजयकांत यांचा खून झाल्याचा दावा त्याने केला आहे.

अल्फोन्सने इंस्टाग्रामवर युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. दिग्दर्शकाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, 'ही पोस्ट उदयनिधी अण्णांसाठी आहे. मी केरळमधून आलो आणि रेड जायंटच्या कार्यालयात बसलो आणि तुम्हाला राजकारणात येण्यास सांगितले.

आयर्न लेडी जयललिता यांना कोणी मारले, कलैगनरला कोणी मारले हेही मी तुम्हाला विचारले आहे. आता कॅप्टन विजयकांतला कोणी मारले हे आता तुम्हाला शोधावे लागेल.

इतकंच नाही तर तो पुढे लिहितो की, "त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका. त्यांनी इंडियन 2 च्या सेटवर स्टॅलिन सर आणि कमल सर यांना आधीच मारण्याचा प्रयत्न केला होता. तरीही तुम्ही खुनी पकडण्याचा प्रयत्न केला नाही, तर पुढचे लक्ष्य तुम्ही किंवा स्टॅलिन सर असतील.'

याशिवाय अल्फोन्सने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने तामिळ अभिनेता अजित कुमारला टॅग केले आहे आणि लिहिले आहे, "मी ऐकलं होतं की तू लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहात. पण ते झालेले नाही. एकतर ज्याने मला ही बातमी दिली तो खोटे बोलत आहे नाहीतर लोक तुमच्याविरुद्ध कट कारस्थान करत आहेत हे तुम्ही विसरलात? या प्रश्नाचे उत्तर मला जाहीर पत्राद्वारे द्या."

सध्या सोशल मिडियावर अल्फोन्सची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टद्वारे त्याने साउथच्या मोठमोठ्या लोकांना अनेक प्रश्न विचारले आहेत. तसेच अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत. मात्र अजून कोणीही त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाहीत. मात्र या पोस्टमुळे चाहत्यांच्या शंकेची पाल मात्र चुकचुकली आहे हे निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT