Mumbai police take legal action against Urfi Javed: आपल्या ड्रेसिंग आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद ही काल पुन्हा सोशल मिडियावर चर्चेच आली. उर्फीला पोलिसांनी अटक केल्याच्या बातम्या सोशल मिडियावर पसरल्या आणि नेटकऱ्यांनी तिच्याबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
उर्फी जावेदचा एक बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता, ज्यामध्ये दोन महिला पोलिस अधिकारी उर्फी जावेदला अटक करताना दिसत आहेत. त्यानंतर हा व्हायरल व्हिडिओ खरा आहे की खोटा याबाबत नेटकऱ्यांना उत्सुकता होती.
त्यानंतर उर्फीने स्वत: या व्हिडिओचा खुलासा केला आणि तो व्हिडिओ बनावट असून प्रसिद्धीसाठी बनविला गेला असं सांगितले. मात्र बनावट पोलिसांसोबत असा व्हिडिओ बनवणे उर्फीला आता महागात पडलं आहे.
याबाबत खुद्द मुंबई पोलिसांनी त्याच्या X वर पोस्ट शेअर करत स्पष्ट शब्दात उर्फीला सुनावलं आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'पोलिसांसोबत हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मुंबई पोलिसांचा गणवेश वापरून असे व्हिडिओ बनवल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी उर्फी जावेदविरोधात एफआयआर नोंदवला आहे.'
पुढे पोलिसांनी सांगितले की, 'ओशिवरा पोलिस ठाण्यात दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओमध्ये सामील असलेल्या लोकांविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 171, 419, 500 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून, त्या खोट्या पोलिसांना अटक करण्यात आली असून वाहनही जप्त करण्यात आले आहे.
तर या व्हिडिओनंतर पोलिसांनी उर्फी जावेदविरुद्ध आयपीसीच्या कलम १७१, ४१९, ५०० आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी गणपत मकवानाला अटक करण्यात आली आहे तर त्याच्याकडून स्कॉर्पिओ कार जप्त करण्यात आली आहे.
दोन पोलिस महिला फरार असून उर्फी जावेदही फरार असल्याचे सांगितले जात आहे. तर उर्फी जावेदचा फोन बंद असून तिने पोलिसांना ती दुबईत असल्याचा मॅसेज केला आहे. उर्फीचा हा व्हिडिओ एका बँडच्या कपड्यांचा होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.