Jr NTR fans burn firecrackers News: Jr. NTR चा काल २१ मेला नुकताच वाढदिवस झाला. RRR फेम Jr. NTR च्या फॅन्सनी एकच धिंगाणा करून थिएटरमध्ये फटाके फोडून आग लावल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय.
यामुळे थिएटरमध्ये मोठी आग लागली असून खुर्च्यांचं प्रचंड नुकसान झालंय. काय घडलाय नेमका प्रकार जाणून घेऊया.
(Fire breaks out inside theatre as Jr NTR fans burn firecrackers during Simhadri re-release)
2003 चा तेलगू चित्रपट सिंहाद्री शुक्रवारी Jr. NTR च्या वाढदिवसानिमित्त तेलुगू राज्यात पुन्हा प्रदर्शित झाला.
4K मध्ये रीमास्टर केलेला आणि रिलीज झालेला चित्रपटाने चांगली ओपनिंग नोंदवली. शनिवारी, विजयवाडामधील एका चित्रपटगृहात चाहत्यांनी फटाके फोडल्यानंतर आग लागली आणि अपघातात काही जागांचे नुकसान झाले.
Jr. NTR चा चित्रपट सर्वत्र जल्लोषात सुरू असताना, विजयवाडा येथील अप्सरा थिएटरला आग लागल्याने एक विचित्र गोष्ट समोर आली. या घटनेची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
आग लागल्यानंतर नाईलाजाने सिनेमाचा शो रद्द करावा लागला. घटनास्थळी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवत सर्वांना सुखरूप बाहेर पडण्यास मदत केली.
SS राजामौली दिग्दर्शित, सिंहाद्री या सिनेमात Jr. NTR सोबतचा प्रमुख भूमिकेत होता. आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट संपूर्ण तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला.
चाहत्यांसाठी ज्युनियर एनटीआरचा ४० वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी रिलीजचे नियोजन करण्यात आले होते.
सिंहाद्री सिनेमा पुन्हा रिलीज होऊनही पहिल्याच दिवशी सिनेमाने ₹5.14 कोटीच्या एकूण संकलनासह जबरदस्त ओपनिंग नोंदवली.
Jr. NTR सध्या त्याचा आगामी तेलुगू चित्रपट देवराच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातून जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांच्या तेलुगु पदार्पणाची चिन्हे आहेत, सैफ अली खान या सिनेमात खलनायकी भूमिकेत आहे.
काही आठवड्यांपूर्वी सैफ अली खान सेटवर जॉईन झाला होता. Jr. NTR च्या RRR सिनेमाने जागतिक स्तरावर नाव कोरलं असून थेट ऑस्कर पुरस्कार जिंकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.