Prabhas: आंध्रप्रदेशमधील एका थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या अतिउत्साहामुळे जे घडलं त्यानं अनेकांच्या जीवावर बेतलं असतं पण थोडक्यात निभावलं म्हणायचं. एका थिएटरमध्ये प्रभासच्या सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यान प्रेक्षकांनी फटाखे फोडल्यानं आग लागली अन् गोंधळ माजल्याची बातमी सध्या जोरदार व्हायरल होत आहे. आग लागल्यामुळे प्रेक्षकांना थिएटर सोडून पळावं लागलं, जीविहानीचं वृत्त नसलं तरी वीत्तहानी झाल्याचं मात्र कळत आहे. थिएटरचे या आगीत बरंच नुकसान झाल्याचं समोर आलं आहे.(Fire in Andhra theatre prabhas fans burst firecrackers during billa screening)
ही घटना आंध्रप्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील ताडेपल्लीगुजडेम मध्ये घडली आहे. रविवारी २३ ऑक्टोबर रोजी प्रभासच्या वाढदिवशी एका थिएटरमध्ये त्याच्या 'बिल्ला' सिनेमाचं स्क्रीनिंग सुरू होतं. या दरम्यान काही अति-उत्साही चाहत्यांनी व्यंकटरमण थिएटरमध्ये फटाके वाजवले. आणि त्यानंतर संपूर्ण थिएटर आगीनं वेढलं गेलं. यामुळे जीवाच्या भीतीनं घाबरलेल्या प्रेक्षकांचा एकच गोंधळ उडाला आणि प्रेक्षक थिएटरबाहेर पळू लागले.
पण वेळीच थिएटर कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्यानं कोणतीही जीवीतहानी झाली नाही. सिनेमा पहायला आलेल्या काही प्रेक्षकांची मदत घेत थिएटर कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.
प्रभासचे काका आणि प्रसिद्ध अभिनेते कृष्णम राजू यांचे निधन काही दिवसांपूर्वी झाले. 'बिल्ला' सिनेमा याआधी २००९ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत होती. प्रभासच्या जन्मदिनाचं औचित्य साधत 'बिल्ला' सिनेमाला आंध्रप्रदेश आणि तेलंगणाच्या काही सिनेमागृहात पुन्हा रिलीज केलं गेलं. या सिनेमाची निर्मिती प्रभासचे दिवंगत काका कृष्णम राजू यांनीच गोपीकृष्ण मूव्हीज बॅनर अंतर्गत केली होती.
दुसरीकडे कळत आहे की, प्रभासनं आपल्या काकांच्या निधनामुळे यंदा आपला वाढदिवस सेलिब्रेट नाही. प्रभासच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं तर सध्या तो त्याच्या 'आदिपुरुष' सिनेमामुळे चर्चेत आहे. प्रभासच्या 'आदिपुरुष' सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊतनं केलं आहे. या सिनेमाचं एक नवं पोस्टर नुकतंच प्रभासच्या वाढदिवसा दिवशी रिलीज करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त प्रभास 'प्रोजेक्ट के' सिनेमात देखील काम करत आहे. हे दोन्ही सिनेमे पुढील वर्षी २०२३ मध्ये रिलीज होणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.