Former Miss World contestant Sherika De Armas dies at 26  Esakal
मनोरंजन

Sherika De Armas Death: माजी मिस वर्ल्ड स्पर्धक शेरिकाचे कॅन्सरने निधन! वयाच्या 26 व्या घेतला अखेरचा श्वास

शेरिका डी अरमासचे वयाच्या 26 व्या वर्षी गर्भाशयाच्या कर्करोगाने निधन झाले.

Vaishali Patil

Former Miss World contestant Sherika De Armas dies: मनोरंजन विश्वातुन एक दुख:द बातमी समोर आली आहे. 2015 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत उरुग्वेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शेरिका डी अरमासचे निधन झाले आहे.

शेरिका डी अरमास ही गर्भाशयाच्या कर्करोगाशी लढा देत होती.तिने केमोथेरपी आणि रेडिओथेरपी उपचार घेतले होते. मात्र 13 ऑक्टोबर रोजी तिची ही झुंझ अयशस्वी ठरली आणि तिचे निधन झाले.

शेरिकाच्या निधनाने उरुग्वे आणि जगभरात शोककळा पसरली आहे. तिचा भाऊ, मायाक डी अरमास याने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली होती.

तो म्हणाला, "नेहमीच उंच उड माझी छोटी बहिण ..". तर मिस युनिव्हर्स उरुग्वे 2022 कार्ला रोमेरोने शेरिका साठी पोस्ट शेयर केली आहे. शेरीका डी अरमासच्या निधनाच्या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला. तिचे चाहते तिला आदरांजली वाहत आहेत.

2015 मध्ये चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत 26 वर्षीय शेरीका डी अरमास टॉप 30 मध्ये नव्हती. मात्र ती सहा 18 वर्षांच्या मुलींपैकी होती.

एका मुलाखतीत ती म्हणाली होती की , "मला नेहमीच मॉडेल व्हायचे होते, मग ते सौंदर्य मॉडेल असो, जाहिरात करणारी मॉडेल असो किंवा कॅटवॉक मॉडेल असो.

मला फॅशनशी संबंधित प्रत्येक गोष्ट आवडते आणि सौंदर्य स्पर्धां तसचं मिस युनिव्हर्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे हे कोणत्याही मुलीचे स्वप्न असते. आव्हानांनी भरलेला हा अनुभव मला जगता आल्याने मला खूप आनंद होत आहे."

26 वर्षीय शेरिकाची स्वतःची मेक-अप लाइन देखील होती. ती आर्मास स्टुडिओ नावाने मेकअपच्या वस्तूचे उत्पादन आणि विक्री करत होती. तिने आपला बराच वेळ कर्करोगाने पीडित मुलांवर उपचार करणाऱ्या पेरेझ स्क्रॅमिनी फाऊंडेशनसाठी काम करण्यात घालवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

Turkey Terror Attack: तुर्कस्तानात मोठा दहशतवादी हल्ला! शक्तीशाली स्फोटात 3 सैनिक ठार, तर १४ जण जखमी

Sikandar Raza : रझा ने दिली सज़ा! सिकंदरने मोडला रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; झिम्बाब्वेने भारतालाही टाकलं मागे

Uddhav Thackeray: साहेब, हेच का निष्ठेचं फळ! शिंदेंकडून ठाकरेंकडे गेलेल्या म्हात्रेंना उमेदवारी; जिल्हाप्रमुखांचा तडकाफडकी राजीनामा

Latest Maharashtra News Updates Live: २८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत १५३ उमेदवारांचे अर्ज

SCROLL FOR NEXT