Mr India Premraj Arora Death: Esakal
मनोरंजन

Mr India Premraj Arora Death: ४२ व्या वर्षी माजी मिस्टर इंडियाचे निधन, वॉशरूममध्ये सापडला मृतदेह !

Vaishali Patil

Mr India Premraj Arora Death: अलीकडेच प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याचवेळी देशातील प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि माजी मिस्टर इंडिया प्रेमराज अरोरा यांचे निधन झाले आहे. प्रेमराज यांचे वय अवघे ४२ वर्षे होते, त्यांच्या मृत्यूचे कारणही हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे.

प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि माजी मिस्टर इंडिया प्रेमराज अरोराचे निधन झाले आहे. प्रेमराज अवघ्या ४२ वर्षाचा होता, त्यांच्या मृत्यूचं कारणही हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे.

42 वर्षीय माजी मिस्टर इंडिया प्रेमराजचा मृतदेह गुरुवारी वॉशरूममध्ये आढळून आला. वर्कआऊट करून तो वॉशरूममध्ये गेला मात्र काही तास उलटूनही तो बाहेर आला नाही. तेव्हा दरवाजा ठोठावला, मात्र त्यांने उत्तर दिले नाही. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

वॉशरूममध्ये त्याला हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रेमराजच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याने कोणत्याही प्रकारची औषधी घेतली नाहीत, निरोगी आहाराचे पालन केले आणि तो फिटनेस कोच आणि जिम इन्स्ट्रक्टर देखील होता.

2012 आणि 2013 मध्ये प्रेमराजने राजस्थानमधील सर्वोत्तम पॉवरलिफ्टिंग स्पर्धा त्यानं जिंकली होती. 2014 मध्ये नागपूर येथे झालेल्या स्पर्धेत प्रेमराजने सुवर्णपदक आणि मिस्टर इंडियाचा किताब पटकावला होता. 2016-18 या वर्षांमध्ये त्याने पुन्हा एकदा मिस्टर राजस्थानचा किताब पटकावला.

प्रेमराज अरोरा हा त्याच्या बॉडी बिल्डिंगमुळे खूप प्रसिद्ध असला तरी 2014 मध्ये त्याने मिस्टर इंडियाचा किताब जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रेमराजच्या पश्चात दोन मुली आणि पत्नी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT