friendship day 2022 : kedar shinde and raj thackeray friendship, one upon a time kedar was struggle to catch picture with raj thackeray  sakal
मनोरंजन

Friendship day 2023: राज ठाकरेंसोबत फोटो काढण्यासाठी धडपडणारा केदार, ते आज..

राज ठाकरे आणि केदार शिंदे यांच्या मैत्रीतला तो किस्सा आहे खास..

नीलेश अडसूळ

friendship day 2022 : मनोरंजन विश्व आणि राजकीय विश्व दोन्ही दोन टोकाला असले तरी बऱ्याचदा यांच्यात एक दुवा पाहायला मिळतो. तो म्हणजे मैत्रीचा. कित्येक राजकीय नेते आणि कलाकार यांच्यात घट्ट मैत्री आहे, किंबहुना हि भारतीय राजकारणाची परंपराच आहे. महाराष्ट्रातही स्वर्गीय विलासराव देशमुख, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक कलाकारांशी घरचे संबंध होते. सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर राज ठाकरे (raj thackeray)हे सर्वाधिक आधाडीवर दिसतील. कारण ते स्वतः कलाकार असल्याने त्यांच्या अनेक कलाकारांशी मैत्री आहे. अशाच त्याच्या मैत मैत्रीचा एक खास किस्सा...

राज यांच्याशी प्रत्येक कलाकाराचे जिव्हाळ्याचे संबंध असले तरी राज यांच्या खास माणसांच्या यादीत क्वचितच लोकांचा समावेश आहे. त्यापैकी एक म्हणजे केदार शिंदे. राज आणि केदार यांच्या (kedar shinde) मैत्रीला थोडी थोडकी नाही तर तब्बल २० वर्षे झाली आहे. या २० वर्षात हि मैत्री इतकी बहरत गेली आज त्यांचे रक्ताच्या नात्यांहून अधिक संबंध आहेत. एक काळ असा होता कि केदार शिंदे हे रंगभूमीवर येऊ घातले आणि राज ठाकरे हे राजकारणात झंजावातासारखे सक्रिय काम करत होते. (friendship day 2022 : kedar shinde and raj thackeray friendship, one upon a time kedar was struggle to catch picture with raj thackeray)

राज यांनी अत्यंत कमी वयात बाळासाहेबांचा हात धरून राजकारणात प्रवेश केला. केवळ प्रवेश केला नाही तर महाराष्ट्र पिंजून काढला. राज यांच्या भाषणाचे आणि कामाचे लाखो चाहते तेव्हाही होते आणि त्याच चाहत्यांमध्ये एक होता केदार शिंदे. केदार यांना पहिल्यापासूनच राज यांचे नेतृत्व भावले होते. त्यावेळी शाहीर साबळेंसोबत लोकधारा आणि नाटकाच्या माध्यमातून जॅम बसणार्याब केदार शिंदेंना कधी एकदा राज यांच्या सोबत फोटो काढेल असे झाले होते. हा फोटो मिळवण्यासाठी त्यांनी बरीच धडपड केली.

राज यांनी अत्यंत कमी वयात बाळासाहेबांचा हात धरून राजकारणात प्रवेश केला. केवळ प्रवेश केला नाही तर महाराष्ट्र पिंजून काढला. राज यांच्या भाषणाचे आणि कामाचे लाखो चाहते तेव्हाही होते आणि त्याच चाहत्यांमध्ये एक होता केदार शिंदे. केदार यांना पहिल्यापासूनच राज यांचे नेतृत्व भावले होते. त्यावेळी शाहीर साबळेंसोबत लोकधारा आणि नाटकाच्या माध्यमातून जॅम बसणार्याब केदार शिंदेंना कधी एकदा राज यांच्या सोबत फोटो काढेल असे झाले होते. हा फोटो मिळवण्यासाठी त्यांनी बरीच धडपड केली.

केदार एका मुलाखतीत म्हणतात, 'रंगभूमीवर बरेच काम सुरु झाले होते. ११९५ च्या सुमारास नाटक आणि सगळ्याच गोष्टी मार्गी लागत होत्या. पण आपलं काम राज यांच्यापर्यंत पोहोचावं असं सातत्याने वाटत होतं. शिवाय त्यांच्यासोबत आपला फोटो असावा यासाठी बरीच धडपड केली. शेवकती २००२ मध्ये आम्ही पहिला फोटो काढला. त्यावेळी राज ठाकरेंच्या बाजूला उभं राहायला मिळतंय याचंच खूप अप्रूप होतं. पण पुढे हि मैत्री इतकी वाढली काही वर्षांनी आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलं आणि आज खांद्यावर हात टाकून फोटो काढू शकतो इतकी घट्ट मैत्री आहे. आज अनेक मित्र भेटले पण राज यांच्यासारखा राजा माणूस क्वचितच भेटतो.' अशा शब्दात केदार राज यांच्या मैत्रीचे वर्णन करतात. त्यांच्या आगामी ''महाराष्ट्र शाहीर'' या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरणही केदार यांनी राज यांच्या जाहीर सभेमध्ये त्यांच्या हस्ते केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT