Gadar 2 Box Office Collection Day 8: अनेक मोठमोठ्या सिनेमांचा रेकॉर्ड मोडत सनी देओलचा 'गदर 2' हा सिनेमा जबरदस्त कमाई करत आहे. या सिनेमाच्या चित्रपटाने कलेक्शनच्या बाबतीत अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकले आहे. गदर 2 ला रिलिज होऊन आता आठ दिवस झाले असले तरी या सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होतांना दिसत नाही आहे.
तारा सिंह आणि सकिनाची ही लव्हस्टोरी आता लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा निर्माते व्यक्त करत आहेत. या बरोबर आता या चित्रपटाने आणखी एक नवीन रेकॉर्ड केला आहे. कमाईच्या बाबतीत सिनेमा आता 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
सुरुवातीच्या आकडेवारी नुसार सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी 18 ते 20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आकडेवारीसहच चित्रपटाने एकूण 302.64 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.
शाहरुख खानच्या पठाणच्या चित्रपटाने आठव्या दिवशी हिंदीत 17.5 कोटींचा व्यवसाय केला तर गदर 2 च्या आठव्या दिवसाच्या कलेक्शनच्या तुलनेत पठाणला मागे टाकले आहे.
या कमाई बरोबरच वयाच्या 65 व्या वर्षी 300 कोटींची कमाई करणारा पहिला बॉलिवूड अभिनेता सनी देओल बनला आहे. 'गदर 2'च्या यशानंतर चाहते आता गदर 3 ची प्रतीक्षा करत आहे. नुकतच सनी देओलने 'गदर 3' बद्दल हिंटही दिली आहे.
सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाने हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईचे रेकॉर्ड तर मोडलेच त्याचबरोबर दक्षिणेचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि दक्षिणेचा सुपरस्टार प्रभासचा 'बाहुबली 2' आणि कन्नड चित्रपटाचा सुपरस्टार यशच्या 'KGF Chapter 2' यांचाही रेकॉर्ड मोडला आहे.
या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार करण्यासाठी 11 दिवस लागले. तर बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या 'दंगल'ला सलमान खानचा 'टायगर जिंदा है' आणि रणबीर कपूरचा 'संजू' यांना 300 कोटींचा आकडा गाठण्यासाठी 13 दिवस लागले. तर सनी पाजीने आठ दिवसातात 300 कोटींचा टप्पा पार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.