Gadar 2 Movie: 'उड जा काले कावा' ते 'मैं निकला गड्डी लेकर' तारा सिंग आणि सकिनाच्या गदरच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांना जितंकं वेड लावलं तशीच काहीशी क्रेझ यावेळीही गदर 2 साठी प्रेक्षकांमध्ये दिसली होती. आज गदर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
प्रेक्षक चित्रपटासाठी खुपच उत्सूक होते आता अनेकांनी हा सिनेमा पाहिला आणि आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेयर केल्या आहेत.
सनी देओल आणि अमिषाच्या गदर 2 ला प्रेक्षकांचा समिंश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना हा सिनेमा फुल मनोरंजन करणारा वाटला तर काहींना निव्वळ 'बकवास'. या सिनेमाला 90 च्या चित्रपटाचा टच देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी दिला आहे. चित्रपटातील डायलॉग आणि गाणी त्याचबरोबर काही सीन्स हे प्रेक्षकांच्या मनाला भिडले आहेत.
गदर 2 मध्येही सनी देओलचा संताप प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. तारा सिंगला राग आला की तो काय करु शकतो हे आपण गदर 1मध्ये पाहिलं होतं. जेव्हा त्याला राग आला तेव्हा त्यानं हॅण्डपंप उखडला आणि शत्रूंना मारला. तो सीन प्रेक्षकांनी तुफान डोक्यावर उचलून धरला होता. गदर 2 मध्ये देखील असचं काहीतरी दिग्दर्शकांनी केलं आहे.
मात्र यावेळी त्याने फक्त हॅण्डपंपच नाही तर दिसेल ते उचललं आणि शत्रूंना मारुन फेकलं आहे. यात त्याने तोफगाड्याचं चाक, विजेचा खांब , हातोडा आणि बरचं काही उखाडलं आहे. हॅण्डपंप उचलतानाच्या सीनवर जसं प्रेक्षकांनी सीनवर टाळ्या ,शिट्या आणि सनी पाजीचा जयघोष केला तरचं काहीसं वातावरण यावेळी देखील चित्रपटगृहात दिसलं.
गदर 2 च्या अॅडव्हान्स बुकिंग कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने जवळपास 5 कोटींचा व्यवसाय केला होता. सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी अॅक्शन ड्रामा चित्रपटाचे भरपुर प्रमोशन केले आहे.
चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटगृहातून बाहेर पडलेले प्रेक्षकही या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.