Sunny Deol Reveals He Was Dyslexic As Child: सनी देओल हा बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांचे कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सनी देओलने यावर्षी गदर 2 चित्रपटाच्या माध्यमातून चांगलीच कमाई केली. आज सनी देओलचा वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊ त्याच्या आयुष्यातील रंजक किस्सा.
गदर 2 या चित्रपटाने 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. सनी या चित्रपटामुळे चर्चेत भाग बनला आहे. काही दिवसांपुर्वी त्याच्या बंगल्याचा लिलाव करण्याच्या बातम्यामुळे तो चर्चेत होता. त्याने गदर 2 निमित्त अनेक मुलाखती दिल्या आहेत. त्यात केलेल्या वक्तव्यामुळे देखील त्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशाच एका मुलाखतीत त्याने त्याला लहाणपणी कोणता आजार होता आणि त्याचा परिणाम त्याच्यावर कसा झाला याचा खुलासा केला.
या मुलाखतीत सनीने त्याच्या बालपणीच्या दिवसांबद्दल सांगितले. तो लहाणपणी शाळेत हूशार मुलगा नव्हता. त्याला कमी मार्क मिळायचे. त्यामुळे त्याचे शिक्षक त्याला खुप मारायचे आणि इतकच नाही तर त्याला डफर, मुर्ख अशी शब्दही ऐकावी लागायची.
याच दरम्याने सनी देओलने खुलासा केला की त्याला 'डिस्लेक्सिया' हा आजार होता. परंतु त्यावेळी त्याला याबद्दल माहितीही नव्हती.
या आजाराबद्दल बोलतांना तो म्हणाला की, "मला लहानपणी 'डिस्लेक्सिया' होता. त्यावेळी आम्हाला याचा अर्थ काय हे देखील माहित नव्हतं. लोक मला वेडे म्हणायचे. मला मारायचे. काही वाचायचं असल्यास त्याचाही मला प्रचंड त्रास व्हायचा. कधी कधी वाचतांना शब्द गोंधळून जायचे"
सनी देओलने पुढे सांगितले की, "लहानपणी माझा आयक्यू खूप जास्त होता. मात्र, डिस्लेक्सिक असल्याने मला शब्द बोलायचा आणि उच्चारायलाही त्रास व्हायचा आणि त्याला बोलण्यातही अडचण यायची. कुणाशी बोलतांनाही मी खुप घाबरायचो."
तो बोलतांना घाबरायचा त्यामुळे अनेकांनी त्याला सार्वजनिक ठिकाणी टेलिप्रॉम्प्टर वापरून बोलण्याचा सल्ला दिला, पण त्याने तो नाकारला. त्याने प्रयत्न केला आणि कालांतराने या आजारावर मात केली.
‘डिस्लेक्सिया’ हा आजार आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटामुळे चर्चेत आला. आता सनीला देखील लहानपणी हा आजार असल्याचं त्याने सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.