Gadar 2 Success Party: सनी देओलचा गदर 2 सिनेमा बॉक्स ऑफीसवर सुपरडुपरहिट झाला. सनी देओलने गदर 2 च्या माध्यमातुन बॉक्स ऑफीसवर धुरळा उडवला. खुप वर्षांनी सनी देओलने गदर 2 च्या माध्यमातुन खऱ्या अर्थाने यश साजरं केलं.
गदर 2 यशस्वी झाला आणि सनी देओलने सक्सेस पार्टी आयोजित केली. या सक्सेस पार्टीला अवघी बॉलिवूड इंडस्ट्री अवतरली. पण विशेष म्हणजे सलमान - शाहरुख - आमिर या तीन खान्सची सक्सेस पार्टीला असलेली विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली.
(gadar 2 success party)
गदर 2 च्या सक्सेस पार्टीला आले तिन्ही खान्स
सनी देओलने आयोजित केलेल्या 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीला इंडस्ट्रीतील तिन्ही प्रसिद्ध खान उपस्थित होते. सलमान खान टी - शर्ट आणि जीन्स या फॉर्मल अवतारात सक्सेस पार्टीला उपस्थित होता. यावेळी कार्तिक आर्यनने सलमानसोबत खास पोझ दिली.
पुढे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सक्सेस पार्टीला उपस्थित होता. जॅकेट, टी शर्ट या स्टायलिश अंदाजात शाहरुख खानची सक्सेस पार्टीला उपस्थिती होती. शाहरुखची पत्नी गौरी खान सुद्धा त्याच्यासोबत आली होती. शाहरूख - सनी देओलने डर सिनेमात एकत्र अभिनय केला होता.
याशिवाय गदर 2 च्या सक्सेस पार्टीत आमिर खान सुद्धा दिसला. टी शर्ट आणि जीन्स या साध्या पण आकर्षक अंदाजात आमिर खानची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. एकुणच गदर 2 च्या सक्सेस पार्टीत तिन्ही खान्सचा विशेष अंदाच लक्षवेधी ठरला.
दिग्दर्शक अनिल शर्मा गदर 2 ऑस्करला पाठवणार
सनी देओल गदर 2 च्या प्रचंड यशाचा आनंद घेत आहे. आतापर्यंत, हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पुढील वर्षी हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात येणार असल्याचे अनिल शर्मा यांनी सांगितले.
याबद्दल बोलताना ते म्हणाले की, " हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात यावा यासाठी लोक मला वारंवार फोन करत आहेत. गदर: एक प्रेम कथा हा सिनेमा त्यावेळी चालला नाही , त्यामुळे गदर 2 कसं काम करेल हे मला माहीत नाही, मात्र आम्ही ते करतोय ."
गदर 2 ऑस्करला गेला पाहिजे कारण...
'गदर 2' ऑस्करला जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर दिग्दर्शक म्हणाले की, "गदर 2 सिनेमा ऑस्करसाठी गेला पाहिजे, चित्रपट त्यासाठी पात्र आहे. गदरही यासाठी पात्रच होता. गदर हा चित्रपट 1947 च्या फाळणीवर आधारित होता. त्याची कथा अगदी वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली होती. ही एक नवीन आणि मूळ कथा होती आणि गदर 2 देखील नवीन आणि ओरिजनल कथा आहे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.