Sunny deol film gadar director anil sharma reveal esakal
मनोरंजन

Gadar 2 : दिग्दर्शकानं स्वत:च्या मुलाचा जीव घातला होता धोक्यात! नेमकं घडलं काय?

भलेही सनीच्या गदर २ ची बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ओएमजी २ सोबत फाईट असली तरी प्रेक्षकांना मात्र उत्सुकता गदरची असल्याचे दिसून येत आहे.

युगंधर ताजणे

Sunny deol film gadar director anil sharma reveal : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा गदर २ पुढील आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक तब्बल २३ वर्षांनी तारा सिंगचा थरार अनुभवणार आहेत. दोन दिवसांपूर्वी गदर २ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

सोशल मीडियावर देखील सनीच्या गदर २ वर कौतूकाचा वर्षाव होत आहे. अमिषा पटेल, सनीच्या या चित्रपटाच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. अनिल शर्मा दिग्दर्शित गदर चित्रपटाचं प्रमोशन सध्या जोरदार सुरु आहे. यानिमित्तानं शर्मा यांची एक मुलाखत व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी गदरच्यावेळी स्वताच्या मुलाचा जीव धोक्यात घातला होता याविषयीची एक आठवण सांगितली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

भलेही सनीच्या गदर २ ची बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ओएमजी २ सोबत फाईट असली तरी प्रेक्षकांना मात्र उत्सुकता गदरची असल्याचे दिसून येत आहे. त्याला कारण दोन दशकानंतर त्याचा दुसरा भाग प्रदर्शित होतो आहे. यापूर्वी देखील सनीचा एखादा चित्रपट प्रदर्शित होताना त्याला बॉलीवूडमधील शाहरुख खान, आमिर खान आणि अक्षय कुमारच्या चित्रपटांचा सामना करावा लागला होता.

यासगळ्यात दिग्दर्शक शर्मा यांनी त्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, गदर हा प्रेक्षकांच्या मनात घर केलेला चित्रपट आहे. ती एक वेगळी भावना आहे. या चित्रपटाच्या अनेक आठवणी आहेत. एक प्रसंग तर कायम लक्षात राहणारा आहे. त्यात मी स्वत खूप घाबरुन गेलो होतो. डोळे बंद करुन घेतले होते. कारण ते मला सगळे न पाहवणारे होते. थोडीशी चूक आणि माझ्या मुलाचा जीव गेला असता. अशा शब्दांत शर्मा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

२००१ मध्ये गदरचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी दिग्दर्शकानं त्यांच्या मुलाचा जीव धोक्यात घातला होता. तो सीन असा होता की, सनीला रेल्वेच्या छतावरुन जाऊन दुसऱ्या डब्यावर उडी घ्यायची होती. त्या रेल्वेचा ताशी वेग ४० किमी इतका होता. सनीच्या खांद्यावर अनिल शर्मांचा मुलगा उत्कर्षही होता. त्यानं तारासिंग आणि सकीनाच्या मुलाची भूमिका साकारली होती. तेव्हा तो फक्त सात वर्षांचा होता.

तो सीन जेव्हा शुट होत होता त्यावेळी खूप घाबरलो होतो. मला उत्कर्षची खूपच काळजी वाटत होती. थोडीशी चूक आणि त्याचा जीव गेला असता. मात्र मला सनीवर खूप विश्वास होता. तो त्याला काही होऊ देणार नाही हे मला माहिती होता. अखेर तो सीन सुरळीत पार पाडला आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला. असे शर्मा यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT