Gadar 2 Special Screening For Indian Army Jawans Got overwhelming  esakal
मनोरंजन

Gadar 2 : तुम्हाला 'गदर 2' कसा वाटला? भारतीय सैन्यासाठी खास स्क्रिनिंग! काय होती प्रतिक्रिया?

गदर २ मध्ये सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

युगंधर ताजणे

Gadar 2 Special Screening For Indian Army Jawans Got overwhelming : हिंदूस्थान जिंदबाद था, जिंदबाद है और जिंदाबाद रहेगा...गदरच्या पहिल्या भागात तारा सिंगचा राग भलताच अनावर झालेला असतो. काहीही झालं तरी आपल्या देशभक्तीच्या आड कुणी आलं तरी त्याला सोडायचं नाही हे तारा सिंगला माहिती असतं. सनी देओलच्या गदरचा २ भाग आता ११ ऑगस्टला चाहत्यांच्या भेटीला येतो आहे.

तब्बल २३ वर्षांनी गदरचा दुसरा भाग प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे सगळ्यांसाठीच खूप खास आहे.दिग्दर्शक अनिल शर्मा आणि त्यांच्या पूर्ण टीमनं या चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही केले आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल हे वाघा बॉर्डरवर गेले तिथे त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रमोशनही केले होते. अशात वाघा बॉर्डरवर जे बीएसएफचे सैनिक हजर होते त्यांनी देखील यावेळी आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत तरतुदी जाणून घ्या

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये सनी देओल हा भारत माता की जय, भारत माता की जय नावाच्या घोषणा देत असल्याचे दिसून आले आहे. आता गदरच्या मेकर्सनं सैनिकांसाठी खास स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर सैनिकांच्या ज्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत त्या कमालीच्या उस्फुर्त असल्याचे दिसून आले आहे. ज्या ऑडिटोरियममध्ये त्या स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते तिथले वातावरण तर देशभक्तीपूर्ण होते.

भारतीय सैनिक आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी गदर २ चे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी चित्रपटाच्या दरम्यान सैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. टाळ्यांचा कडकडाटात केला. हिंदूस्थान जिंदाबाजचा घोष ऐकू येत होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गदर २ पाहिल्यानंतर सैनिक भान हरपून गेले होते. ते काही काळ स्तब्ध होते. त्यांना या चित्रपटानं खूपच प्रभावित केल्याचे दिसून आले.

गदर २ मध्ये सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. खरं तर बॉलीवूडची सर्वाधिक वादग्रस्त अभिनेत्री म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या कंगनानं सनीच्या गदर २ चित्रपटाचे कौतूक केले आहे. गदर २ हा भारतात सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरणार आहे. असे म्हटले आहे. गदर २ ची गोष्ट ही १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाविषयी सांगते.

गेल्यावेळेस तारा सिंग हा सकीनाला वाचविण्यासाठी पाकिस्तानात गेला होता. आता तो त्याचा मुलगा चरणजीत आणि सुनेला पाकिस्तानातून आणण्यासाठी गेला आहे. गदर २ चा ट्रेलर प्रेक्षकांना तुफान आवडला आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT