Omg 2 vs Gadar 2 hype is real but clash with sunny deol : बॉलीवूडचा डॅशिंग अभिनेता सनी देओलची गोष्टच वेगळी आहे. गेल्या तीन दशकांहन अधिक काळ या अभिनेत्यानं चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आता तो तब्बल २३ वर्षांनी त्याच्या गदर २ नावाच्या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर येतो आहे. मात्र यासगळ्यात सनीच्या या चित्रपटाला खिलाडी अक्षय कुमारच्या ओह माय गॉड २ शी फाईट करावी लागणार आहे.
सनी देओल, अमिशा पटेल, अमरीश पुरी यांच्या भूमिका असलेल्या अनिल शर्मा दिग्दर्शित चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला होता. सनीचा गदर जेव्हा प्रदर्शित झाला होता त्याचवेळी आमीरचा लगानही प्रदर्शित झाला होता. त्याला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले होते. किंबहूना आमिरच्या लगानला जास्त पसंती मिळताना दिसत होती.
Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ
लगान हा ऑस्करच्या शर्यतीत होता. मात्र त्यावर्षी या चित्रपटाला पुरस्कारानं हुलकावणी दिली. यासगळ्यात सनी आणि आमिर यांच्यात पुन्हा तू तू मैं मै सुरु झाली होती. बऱ्याच वर्षांपासून या दोन्ही सेलिब्रेटींमध्ये अनबन आहे. ते कधीही एकमेकांशी बोलताना दिसले नाहीत. हेच चित्र शाहरुखसोबत देखील कायम आहे. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत.
यावेळी अक्षय कुमारनं सनी भाईशी पंगा घेतला आहे. अकरा ऑगस्टला अक्षयचा ओह माय गॉड नावाचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. हे दोन्ही चित्रपट सिक्वेल आहेत. त्याची चाहते बऱ्याच वर्षांपासून प्रतिक्षा करत आहेत. पाकिस्तानात जाऊन तारा सिंगचा गदर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दुसरीकडे अक्षयला नव्या रुपात पाहण्याची चाहत्यांना ओढ लागली आहे. मात्र यात एकाच दिवशी या दोघांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न चाहत्यांना, नेटकऱ्यांना पडला आहे.
९० च्या दशकांपासून सनी आणि अक्षयचा चाहतावर्ग मोठा राहिला आहे. कालांतरानं सनीनं काही काळ बॉलीवूडपासून ब्रेक घेतला होता. अक्षय सक्रिय राहिला. आता या दोघांचे चित्रपट एकमेकांसमोर आल्यानं कुणाला फायदा होणार आणि कुणाला नुकसान याविषयी चर्चा सुरु झाली आहे. सनीच्या चित्रपटांचे रेकॉर्डस पाहिले तर त्याच्या अनेक चित्रपटांना अशा क्लॅशेसचा सामना करावा लागला होता.
पहिलं होतं ते आमीर विरुद्ध सनी -
सनी आणि आमिर यांचं क्लॅश रेकॉर्ड हे तीस वर्षांपूर्वीचे आहे. १९९० मध्ये त्या दोघांच्या फिल्मस प्रदर्शित झाल्या होत्या. २२ जून रोजी आमिर आणि माधूरीची दिल तर सनी आणि मीनाक्षी शेषाद्रीचा घायल. दोघांनाही बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद मिळाला होता. सनीचा अँग्री लूक चाहत्यांना भावला तर दुसरीकडे आमिरची कॉमेडी आणि रोमान्सचा अंदाज आवडला. ९० च्या दशकांतील बॉक्स ऑफिसची गोष्ट वेगळी होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे.
त्यानंतर पुन्हा १९९६ मध्ये सनीचा घातक थिएटरमध्ये आला. तो चाहत्यांना आवडला. प्रेक्षकांची गर्दी होत होती. मात्र तेवढ्यात आमिर खान आणि करिश्माचा राजा हिंदूस्थानी आला आणि आमिरला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या चित्रपटाची गाणी प्रचंड हिट झाली होती. करिश्मा आणि आमिरचा तो किंसिंग सीन यावेळी खूपच चर्चेत आला होता. घातकच्या तुलनेत राजा हिंदूस्थानी हिट झाला होता. त्यानंतर गदरच्या वेळी देखील असेच घडले होते.
२००१ मध्ये सनीचा गदर आला. आमिरचा लगान प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र याही वेळी आमिर खाननं बाजी मारली होती. त्याला गदरच्या तुलनेत अधिक यश मिळाले होते. आमिरला पहिल्यांदा गदरची प्रचंड भीती वाटली होती. पण चित्र बदलले. आमिर आणि सनी देओल यांनी बॉक्स ऑफिसवर वेगळाच इतिहास निर्माण केला होता.
शाहरुख आणि सनी देओल....
१९९३ मध्ये शाहरुख आणि सनी देओलचा डर नावाचा चित्रपट आला होता. हा त्या दोघांचा पहिलाच चित्रपट. त्यानंतर ते कधीही एकत्र दिसले नव्हते. पुढे १९९६ मध्ये शाहरुखचा इंग्लिश बाबू देसी मेम नावाचा चित्रपट आला होता. दुसरीकडे सनीचा दुश्मनी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर १९९७ मध्ये सनीचा जिद्दी नावाचा चित्रपट आला. त्याच्या जोडीला शाहरुखचा कोयला नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. शाहरुखच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
शाहरुख आणि सनीमध्ये पुन्हा क्लॅश...
तिसऱ्यांदा शाहरुख आणि सनीमध्ये क्लॅश झाले होते. १९९९ मध्ये या दोन्ही सेलिब्रेटींच्या तीन मुव्हीज आल्या होत्या. त्यात सनीचा अर्जून पंडित, शाहरुखचा बादशाह. त्यात शाहरुखचा बादशहा चालला तर सनीचा अर्जून पंडित आपटला होता.
त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद काही मिळाला नाही. शाहरुखच्या बादशहानं त्याला पुढे बॉलीवूडचे बादशहाच बनवून टाकले. पुढे २००१ मध्ये हे दोन्ही अभिनेते एकमेकांसमोर आले होते. त्यात शाहरुखचा अशोका रिलिज झाला होता. तर सनीच्या इंडियन या चित्रपटानं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. यावेळी शाहरुखचा अशोका फ्लॉप झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.