Game Changer OTT Rights: यंदाचे वर्ष बॉलिवूड सिनेमांसाठी खुपच खास होते. शाहरुख खानने पठाण आणि जवान सारखे हिट सिनेमे दिले तर सनी देओलने गदर 2 आणि अक्षयच्या ओएमजी2 ने देखील कमाल केली आहे. तर साउथमध्ये रजनीकांतच्या जेलरने धुमाकूळ घातला.
तर अनेक चित्रपटांची प्रेक्षक प्रतिक्षा करत आहे. ज्यात प्रभासचा सालार, विजयचा लिओ, रणबीरचा अॅनिमल , सलमान खानचा टायगर 3 आणि शाहरुखचा डंकी असे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी तयार आहेत.
तर दुसरीकडे आरआरआर चित्रपटामुळे लोकप्रिय झालेला साउथ स्टार राम चरण देखील गेम चेंजर या चित्रपटातुन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. राम चरण आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच गेम चेंजर नावाच्या अॅक्शनपटात दिसणार आहे.
गेम चेंजर हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. मात्र या चित्रपटाने रिलिजपुर्वीच करोडो रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने रिलीज होण्याच्या अगोदरच चांगली कमाई केली आहे.
या चित्रपटाचा फक्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 7 मार्च रोजी राम चरणच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर शेअर केले गेले. राम चरणचे फॅन या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. आता या चित्रपटाची क्रेझ लक्षात घेता या चित्रपटाने आपले डिजिटल हक्क विकल्याची बातमी समोर आली आहे.
OTTPlay नुसार, गेम चेंजर चित्रपटाच्या मेगा-प्रॉडक्शचे डिजिटल अधिकार Zee5 ने खरेदी केले आहेत. इतकच नाही तर या चित्रपटाचे ओटीटी हक्क 250 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले आहेत अशी चर्चा आहेत. असं झाल्यास हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील विक्रमी करार ठरेल. मात्र अभिनेते किंवा निर्मात्यांनी याबाबत अधिकृत माहीती दिलेली नाही.
या चित्रपटाचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. या चित्रपटात राम चरण आणि कियारा अडवाणीशिवाय श्रीकांत, सुनील आणि जयराम दिसणार आहेत. काही काळापूर्वी या चित्रपटातील एक गाणे ऑनलाइन लीक झाले होते. गाणे लीक झाल्याप्रकरणी निर्मात्यांनी एफआयआर दाखल केली आहे.
गेम चेंजर या चित्रपटाद्वारे कियारा आणि रामची जोडी दुसऱ्यांदा एकत्र येणार आहे. यापुर्वी त्यांनी विनया विधेया या चित्रपटात एकत्र काम केले होते. 'गेम चेंजर' हा शंकर दिग्दर्शित चित्रपट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.