Ganesh Festival 2023 Salman Khan Trolled Ganesh Utsava : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या स्टाईल आणि प्रतिक्रियांसाठी चर्चेत असतो. सलमानच्या घरचा गणपती उत्सव हा त्याच्या तमाम चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. मात्र काही नेटकऱ्यांनी यंदाही सलमानला त्यावरुन ट्रोल केले आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
सलमानच्या बहिणीच्या अर्पिताच्या घरी बाप्पाचे आगमन झाल्यानंतर एक व्हिडिओ इंस्टावरुन शेयर केला आहे. त्यावरुन तो चर्चेत आला आहे. त्याच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. त्याचे कारण म्हणजे सलमाननं सहकुटूंब सहपरिवार केलेली गणेशाची आरती. त्यावरुन काही नेटकऱ्यांनी भाईजानवर आगपाखड केली आहे. त्याला तू आता इस्लामच्या नावावर कलंक आहे. असेही म्हटले आहे. फ्री प्रेस जर्नलनं याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
तो व्हिडिओ अर्पिता आणि आयुषच्या घरातील असून त्यावरुन सलमानला आता नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. त्याच्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी त्याला धर्मावरुन सुनावले आहे. सलमाननं गणरायाची आरती केली आहे. तो व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. सलमानच्या घरी देखील गणरायाचे आगमन होत असते. त्यावरुनही त्याला अनेकदा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
गणपती बाप्पा मोरया...असे लिहित सलमाननं सोशल मीडियावर तो व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यावरील कमेंटस मात्र सलमानवर आगपाखड करणाऱ्या आहेत. काहींनी भाईजानवर कौतुकाचा वर्षावही केला आहे. तर काहींनी त्याला सुनावले आहे.
सलमान खानच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, या वर्षी दिवाळीमध्ये त्याचा टायगर ३ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या चित्रपटाची सलमानच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. यापूर्वी त्याच्या टीझरला आणि सलमानच्या लूकला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमाननं प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरसोबत एका प्रोजेक्टवर साईन केली असून त्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक विष्णू वर्धन हे करणार आहेत. यापूर्वी सलमानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला चाहत्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.